crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आरोपींच्या भावकीतली एका विद्यार्थिनीला पीडित विद्यार्थ्याने शाळेतून घरी सोडले म्हणून हा गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मावळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
Mumbai High Alert : अग्निवीर जवानाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक
नेमकं काय प्रकरण?
फिर्यादी अक्षय एकनाथ मोहिते यांनी दिलेल्या फिरायडीनुसार, अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकतो. त्याने आरोपींच्या भावकीतील एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडले होते. याच कारणावरून आरोपी सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजित राजाराम ओवाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी फिर्यादीच्या चुलत भावाला शाळेबाहेरील स्कॉर्पिओमधून घेऊन मारहाण केली. त्यानंतर आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अक्षय मोहिते आपल्या मित्रांसह एकविरा चौकात बसले होते. त्यावेळी आरोपी पुन्हा तिथे आले. आरोपी रणजित ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी सौरभ वाघमारे आणि अभिषेक ओव्हाळ स्प्लेंडर मोटरसायकलवर आले.सौरभ वाघमारे याने पिस्तूल काढून अक्षय मोहिते यांच्या दिशेने गोळी झाडली, पण ती फायर झाली नाही. राऊंड खाली पडला. त्यानंतर अक्षय मोहिते आणि त्याचे मित्र पळून जात असताना आरोपीने पुन्हा एकदा गोळीबार केला. ही गोळी कोणालाही लागली नाही. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अक्षय जवळच्या सोसायटीत लांबल्याने बचावला.
या घटनेनंतर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन पथके रवाना करत आरोपींना तीन अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिषेक राजाराम ओव्हाळ (वय २८), रणजित बाळासाहेब ओव्हाळ (वय २३), प्रथम सुरेश दिवे (वय २३) असे आहे. अद्याप एक आरोपी फरार आहे.वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परंतु विध्यार्थ्यांच्या वादातून गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता
दम्यान, पुण्यातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक पुणे जिल्हा, लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, आयटी पार्क्स, औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था आणि कृषी क्षेत्र यांमुळे सतत विकसित होत आहे. मात्र या वेगवान विकासाचा परिणाम होऊन ग्रामीण पोलीस दलावर प्रचंड ताण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात सुमारे ३,६०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे २०० कर्मचारी राज्य महामार्ग सुरक्षा दलात कार्यरत असल्याने प्रत्यक्षात कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी होते. जिल्ह्यात सध्या ३९ पोलीस ठाण्यांद्वारे ग्रामीण भागात पोलीस कारभार चालवला जात आहे.
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना