Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा

पतसंस्थेचे सोने मूल्यांकन करणारे कर्मचारी किरण सूर्यकांत दहीवाळ यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार व्यवस्थापक योगेश गावडे यांनी ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर करून ही रक्कम मोरे यांच्या बचत खात्यात जमा केली. त्यानंतर १६ जून २०२६ रोजी मोरे यांनी पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली वजनाचे दागिने तारण ठेवून ६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज घेतल

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2026 | 11:26 AM
सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा

सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा

Follow Us
Follow Us:
  • सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण ठेवून फसवणूक.
  • पतसंस्थेला ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा गंडा.
  • आरोपी सचिन राधाकिसन मोरे याने दोन वेळा कर्ज घेतले.
मंचर : सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने तारण ठेवत एका पतसंस्थेकडून तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अधिकारी राजेंद्र शिवराम गायकर (वय ६०, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ शाखेत ८ जून २०२६ रोजी सचिन राधाकिसन मोरे (रा. नांदूर, ता. आंबेगाव) यांनी खाते उघडून पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले. त्याच दिवशी त्यांनी ३८ ग्रॅम ६०० मिली वजनाचे दागिने सोने तारण कर्जासाठी ठेवले. पतसंस्थेचे सोने मूल्यांकन करणारे कर्मचारी किरण सूर्यकांत दहीवाळ यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार व्यवस्थापक योगेश गावडे यांनी ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर करून ही रक्कम मोरे यांच्या बचत खात्यात जमा केली. त्यानंतर १६ जून २०२६ रोजी मोरे यांनी पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली वजनाचे दागिने तारण ठेवून ६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. अशाप्रकारे दोन व्यवहारांत एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलले.

दरम्यान, काही दिवसांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांबाबत मूल्यांकन करणारे कर्मचारी दहीवाळ यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी दागिन्यांचे पुन्हा मूल्यांकन केले असता, त्यामध्ये केवळ २२.५७ टक्के सोने आणि ७७.२६ टक्के चांदी असल्याचे आढळून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय, मोरे यांनी दिलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता नांदूर येथे या नावाची व्यक्ती राहत नसल्याचे समोर आले. तसेच कर्जासाठी सादर केलेली कागदपत्रेही खोटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण ठेवून खोटी कागदपत्रे सादर करत पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गायकर यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

FAQ

१. पतसंस्थेची फसवणूक किती रकमेची झाली?
श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

२. फसवणूक कशी करण्यात आली?
सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

३. आरोपीने किती वेळा कर्ज घेतले?
सचिन राधाकिसन मोरे यांनी दोन वेळा दागिने तारण ठेवून कर्ज घेतले.

Web Title: Silver ornaments pledged as gold credit society swindled of 9 lakh rupees nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Fraud Case
  • Gold Jewellery
  • Manchar News

संबंधित बातम्या

Dhanteras 2026 Gold Exchange : धनत्रयोदशीला जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणे योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाचे नियम
1

Dhanteras 2026 Gold Exchange : धनत्रयोदशीला जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणे योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाचे नियम

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…
2

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…
3

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

Mumbai Crime News: विश्वासघातकी कर्मचारी निघाले चोर! दिवाळी साफसफाईसाठी बोलावलेल्या तरुणांनी साफ केले महिलेचे कपाट!
4

Mumbai Crime News: विश्वासघातकी कर्मचारी निघाले चोर! दिवाळी साफसफाईसाठी बोलावलेल्या तरुणांनी साफ केले महिलेचे कपाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.