Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा OSD असल्याचा बनाव करत PWD ची ५० कोटींची बिले मंजूर करण्याचे आमिष दाखवून एका कंत्राटदाराला तब्बल ३.२५ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. आणखी ७५ लाख मागितल्याने भामट्याचे भांडे फुटले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 03, 2026 | 01:33 PM
Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्...

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्...

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ओएसडी असल्याचे भासवून ३.२५ कोटी उकळणारा अटकेत
  • PWD ची ५० कोटींची बिले मंजूर करण्याचे आमिष दाखवून फसवणूक
  • आणखी ७५ लाखांची मागणी केल्याने भांडे फुटले
Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून एका कंत्राटदाराकडून तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. सरकारी खात्यातील ५० कोटी रुपयांच्या प्रलंबित बिलांना मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने ही प्रचंड रक्कम लाटली. एवढे पैसे उकळल्यानंतरही आरोपीची हाव सुटली नाही आणि त्याने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली, ज्यामुळे कंत्राटदाराला संशय आला अन् या संपूर्ण महाठगबाजीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तातडीने कारवाई करत छत्रपती संभाजीनगर येथील ४० वर्षीय आरोपी आसिफ इस्माईल पठाण याला बेड्या ठोकल्या आहेत.

५० कोटींच्या बिलांचे दाखवले आमिष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील ‘ओबेरॉय कन्स्ट्रक्शन’चे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची या प्रकरणात मोठी फसवणूक झाली आहे. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सुमारे ५० कोटी रुपयांची बिले प्रलंबित होती. ही थकीत बिले सहज मंजूर करून देण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी (CMO) आपले जवळचे संबंध असल्याचे आरोपी आसिफ पठाण याने भासवले. स्वतः मुख्यमंत्र्यांचा OSD असल्याची बतावणी करून त्याने कंत्राटदाराचा विश्वास संपादन केला.

प्रलंबित बिलांची मंजुरी मिळवण्यासाठी कमिशन द्यावे लागेल, असे सांगत आरोपीने टप्प्याटप्प्याने कंत्राटदाराकडून ३.२५ कोटी रुपये उकळले. यातील १.२५ कोटी रुपयांचा हप्ता स्वीकारण्यासाठी १० सप्टेंबर रोजी कंत्राटदाराला मुंबईत बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपीने स्वतःच्या साथीदारामार्फत ही रक्कम स्वीकारली होती.

हेही वाचा: Helicopter Accident: एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मोठी दुर्घटना; नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात भारतीय नागरिक दगावला!

७५ लाखांच्या अतिरिक्त मागणीमुळे भांडे फुटले

३ कोटी २५ लाख रुपये दिल्यानंतरही काम मार्गी न लागल्याने आणि आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केल्याने कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांना तीव्र संशय आला. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी थेट मुंबईतील मंत्रालयात जाऊन संबंधित OSD आणि अधिकाऱ्याबाबत खातरजमा केली. त्यावेळी आसिफ पठाण नावाचा कोणताही अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात किंवा मंत्रालयात कार्यरत नसल्याचे उघड झाले. आपली कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओबेरॉय यांनी तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कंत्राटदाराच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आसिफ इस्माईल पठाण याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या महाठगबाजीत आणखी कोणा बड्या अधिकाऱ्याचा किंवा साथीदाराचा सहभाग आहे का? आरोपीने उकळलेली कोट्यवधींची रक्कम कुठे लपवून ठेवली आहे? तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती कंत्राटदारांना जाळ्यात ओढले आहे, याचाही शोध मरीन ड्राईव्ह पोलीस घेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही फसवणुकीची घटना कुठे आणि कोणासोबत घडली?

    Ans: ही घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अकोल्यातील ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची ३ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

  • Que: आरोपीने कंत्राटदाराची फसवणूक कशी केली?

    Ans: आरोपी आसिफ पठाण याने स्वतःला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून, PWD कडील ५० कोटींची थकीत बिले मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली.

  • Que: या प्रकरणी कोणाला अटक झाली असून सध्या काय कारवाई झाली आहे?

    Ans: याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील आसिफ इस्माईल पठाण (वय ४०) याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Mumbai fake osd devendra fadnavis contractor cheated 3 crore sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • Crime . Crime News
  • Fraud Case
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: GNM उमेदवारांचा संताप! ANM ला प्राधान्य, आम्हाला का डावललं?
1

Mumbai News: GNM उमेदवारांचा संताप! ANM ला प्राधान्य, आम्हाला का डावललं?

Mumbai News: दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड! पश्चिम रेल्वेचे ‘ऑपरेशन दीप’; १४ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम
2

Mumbai News: दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड! पश्चिम रेल्वेचे ‘ऑपरेशन दीप’; १४ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…
3

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश
4

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.