Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg Crime: जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत

सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत जमिनीच्या वादातून 65 वर्षीय सरस्वती सावंत यांची कोयत्याने हत्या करण्यात आली. शेतात झालेल्या वादानंतर पिता-पुत्राने हल्ला केला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 11:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून हाणामारी, महिलेची हत्या
  • कोयत्याने डोक्यावर वार; जागीच मृत्यू
  • आरोपी पिता-पुत्र पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेला जमीचा वाद अचानक रक्तरंजित हल्ल्यात बदलला. एका ६५ वर्षीय महिलेची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरस्वती सावंत असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील ओवलीये-मधलीवाडी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे.

काय घडलं नेमकं?

ओवलीये येथील सावंत कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरु होता. शनिवारी सरस्वती सावंत या आपला मुलगा एकनाथसोबत घराशेजारील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे शेजारी राहणारे विजय कृष्णा सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत हे आले. “तुम्ही आमच्या जमिनीत काय करता?” असा सवाल करत त्यांनी वादाला सुरुवात केली.

Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत होता?

कोयत्याने डोक्यावर वार

सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या विजय आणि रघुनाथ या पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर भीषण वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, सरस्वती या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हे बघून एकनाथ सावंत हा हादरून गेला.

पोलिसांना संपर्क आणि…

त्याने तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधले आणि घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सरस्वती सावंत यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

आरोपी अटकेत

या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपी विजय कृष्णा सावंत आणि रघुनाथ विजय सावंत या पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai: मॅट्रिमोनी साईटवरून डझनभर महिलांची फसवणूक; ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून शोषण करणारा 21 वर्षीय तरुण अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे हल्ला करण्यात आला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पिता-पुत्राला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Sindhudurg crime bloody attack in sawantwadi over land dispute 65 year old woman hacked to death with a machete father and son arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.