Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत होता?
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, खरात तपासात अजिबात सहकार्य करत नाही. अशोक खरात महिलांना विवस्त्र करून किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्यापूर्वी विशिष्ट पेढे आणि एका गूढ द्रव पदार्थाचा (Liquid Substance) वापर करत असे. त्या पेढ्यामध्ये कोणते घटक मिसळले जात होते आणि या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत मिळत होती. याबाबत त्याने अद्याप मौन बाळगले आहे. या गूढ द्रव पदार्थाचा शोध घेणे आणि रासायनिक चाचणी करणे तपासासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे त्याची कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती पोलिसांनी केली होती.
तर, बचाव पक्षाच्या वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. मात्र एसआयटीचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अशोक खरातला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता पुढील दोन दिवसांत एसआयटी त्या गुंगी आणणाऱ्या पदार्थ कोणते होते. खरात त्यात काय मिसळत होता. याचा तपास केला जाणार आहे.
एसआयटीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा पिडीत महिलांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी ठराविक प्रकारचे पेढे आणि खारट चवीचे पाणी (द्रव पदार्थ) वापरत असे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर संबंधित महिलांना मळमळ होणे, डोके गरगरणे किंवा डोके जड होणे अशा तक्रारी जाणवत. पीडित महिलेची शुद्ध हरपल्यानंतर खरात आपल्या केबिनमधील दिवे बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे.
दुसरीकडे अशोक खरातचे सिन्नर तालुक्यातील मिरगावातील इशान्येश्वर देवस्थान चर्चेत आले आहे. या देवस्थानाचा पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश नसतानाही या मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1 कोटी 5 लाख निधी वितरित करण्यात आला होता. हा मु्द्दादेखील समोर आला आहे. धक्क्दायक बाब म्हणजे या निधीसाठी प्रस्ताव कुणाचा होता, त्यासाठी कोणी शिफारस केली. याची कोणतीही माहती शासन दरबारी उपलब्ध नाही. प्रशासनाकडे संबधित कागदपत्रांची स्पष्टमाहितीच नसल्याचे प्रसासनचेही धाबे दणाणले आहेत. देवस्थानच्या निधीचा प्रस्ताव अचानक गायब कसा झाला, खरातच्या या मंदिराला राजकीय वरदस्तातून निधी मिळाला का, असा संशय व्यक्त केला जात आहे.






