Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg Crime: शिकार बनला शिकारी! अंदाज चुकला आणि गोळी थेट तरुणाच्या छातीत; २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सावंतवाडीतील ओवळीये जंगलात रानडुक्कराच्या शिकारीदरम्यान चुकीच्या अंदाजातून झाडलेली गोळी 28 वर्षीय सचिन मर्गजला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. साथीदार सिप्रियान डॉन्टस ताब्यात; शस्त्र परवाना व अवैध शिकार तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 06, 2025 | 03:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ओवळीये जंगलात रानडुक्कर शिकार मोहिमेदरम्यान दुर्घटना
  • साथीदाराने हालचालीला प्राणी समजून गोळी झाडली
  • २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्ग: सावंतवाडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी येथील ओवळीये जंगल परिसरात रानडुक्कराच्या शिकार मोहिमेदरम्यान एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार सकाळी उघडकीस आली. सचिन सुभाष मर्गज असे मृतकाचे नाव असून तो मूळचा सांगोली येथील रहिवासी आहे. तो वेल्डिंगचा काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो नातेवाईकांकडे गेला होता. चुकीच्या अंदाजातून झाडलेल्या गोळीने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शिकारीला जातांना सिप्रियान डॉन्टस (वय 45, रा. कोलगाव) हा देखील सचिन सोबत होता. या दोघांबरोबर आणखी काही ओळखीचे मित्रही जंगलात गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून पोलीस वेगात तपास करत आहे.

Parbhani Crime: भीषण अपघात! परभणी-वसमत महामार्गावर कारची समोरासमोर धडक, जागेवरच तिघांचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

सचिन, सिप्रियान आणि यांचे काही मित्र रानडुक्कराच्या शिकारीसाठी ओवळीये जंगलात दाखल झाली होती. सिप्रियान डॉन्टस हा डबल बॅरल बंदूक घेऊन आला होता. तो आधी कोलगावहून सांगेली येथे आला आणि तिथून सचिनला घेऊन जंगलाच्या दिशेने रवाना झाला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिकार करतांना सचिन याला रान उठवण्याची जबाबदारी होती. तो झाडाझुडपातून पुढे सरकून शिकार लक्ष्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता. सिप्रियान डॉन्टस हा एका ठिकाणी दबा धरून बसला होता. त्याचवेळी झुडपात हालचाल झाल्याने त्याला असे वाटले की समोर प्राणी आहे. आणि त्याने त्यादिशेने बंदुकीची ट्रिगर दाबली. मात्र गोळी ही थेट सचिनच्या हनुवटीवरून छातीच्या उजव्या बाजूला घाव बसला. गोळी लागताच तो जागेवरच कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर इतर मित्रांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा त्याची मृत्यू झाली होती.

एक संशयित ताब्यात

याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सिप्रियान डॉन्टसला ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा केला असून, घटना कशी घडली यावरील सर्वदृष्टी तपास तसेच शस्त्र परवान्याबाबतची चौकशी पोलीस करत आहे. हा खरंच अपघात होता की काही वेगळेच याची देखील चौकशी पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सावंतवाडीतील ओवळीये जंगल परिसरात.

  • Que: गोळी कशी लागली?

    Ans: झाडीत हालचाल दिसल्याने साथीदाराने प्राणी समजून गोळी झाडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सिप्रियान डॉन्टसला ताब्यात घेतले असून शस्त्र व अवैध शिकार तपास सुरू.

Web Title: Sindhudurg crime the guess was wrong and the bullet went straight into the chest of the young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?
1

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?

एक फ्लॅट, दोन मित्र आणि विचित्र अट; अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर
2

एक फ्लॅट, दोन मित्र आणि विचित्र अट; अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर

Solapur Crime: करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून
3

Solapur Crime: करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रील बनवण्याच्या नादात बसची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी
4

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रील बनवण्याच्या नादात बसची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.