काय घडलं नेमकं?
बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर या कारने आरळ येथून परभणीच्या दिशेने येत होते. त्यावेळी समोर समोरून येत असलेली क्रेटा कारच्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बाबाराव दत्तराव साखरे, विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत) या तिघांचा घटनास्थळीच मुत्यू झाला. तर त्यांच्या सोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे, हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
गुन्हा दाखल
या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. पोलिसांनी याप्रकरणी क्रेट क्रेटा कार क्रमांक एमएच 22 बीसी 7888 च्या चालकावर भारतीय न्यायसंहिता कायद्याच्या अनुच्छेद 106(1), 281, 125(अ) आणि 125(ब) नुसार ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.
बुलढाण्यात खळबळ! बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या गायब; क्लासला जातो म्हणत घर सोडलं आणि…
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तीन अल्पवयीन मुली अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
टेक्निकल क्लासला जातो म्हणत त्यांनी घर सोडलं. शेवटच्या या तिन्ही मुली बस स्थानकात दिसल्या. त्यानंतर त्या कोठेही दिसल्या नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिसांना या तिन्ही मुलीना शोधण्याचं आवाहन असणार आहे.
क्लासला जातो म्हणत घर सोडलं
नेहमीप्रमाणे त्या टेक्निकल क्लाससाठी घरातून निघाल्या होत्या. काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकात पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर ते कुठेच दिसले नाही. तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे असे बेपत्ता असलेल्या मुलींचे नावे आहे. त्यांचे वय अंदाजे 16 वर्षे असून त्या मूळच्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील आहेत.
पासबुक सोबत गेले
या तिन्ही मुली शाळेत शिकत होत्या. त्या शाळेत शिकत असलेल्या व्यवस्थापनाने तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. या तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले होते. याची माहिती तिन्ही मुलीना मिळाल्यानंतर यानंतर त्या अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.
कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू
Ans: परभणी-वसमत महामार्गावरील रहाटीजवळ.
Ans: तिघांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी.
Ans: क्रेटा कारच्या चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा.






