Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: शेतीच्या पाण्यावरून वाद; जन्मदात्या बापानेच मुलाची लोखंडी गजाने केली हत्या, माढ्यात खळबळ

माढा तालुक्यातील रुई येथे शेतीला पाणी देण्याच्या वादातून बापाने झोपेत असलेल्या मुलावर लोखंडी गजाने हल्ला करून हत्या केली. आईच्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 08:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेतीच्या पाण्यावरून वडील-मुलात वाद
  • झोपेत असलेल्या मुलाची लोखंडी गजाने हत्या
  • आईच्या फिर्यादीवरून आरोपी बाप अटकेत
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. याच कारणातून रागाच्या भरात बापानेच आपल्या तरुण मुलाची हत्या केली. ही घटना माढा तालुक्यातील रुईमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

शेतीला पाणी देण्यावरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाले होते. या वादात बापाला मुलाने शिव्या दिल्याचा राग आला होता हाच राग मनात धरून वडिलाने घरात झोपलेल्या अवस्थेतील मुलाला लोखंडी गजाने मारहाण करून त्याची हत्या केली.

Mumbai Crime: 500 सीसीटीव्ही, महिलेचा मृतदेह आणि पडलेल्या दुचाकीच्या नंबरवरून काढला खुनी पतीचा शोध! वसईतली धक्कादायक घटना

याप्रकरणी मृत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून हत्या केलेल्या राजेंद्र पतंगे या बापावर टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ कारणावरुन मुलाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.

करमाळ्यात १० दिवसांत ५ महिला बेपत्ता; गुढ वाढल्याने पोलिस अलर्टवर

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून गेल्या दहा दिवसांत पाच महिला आणि तरुण मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एकामागोमाग एक घडणाऱ्या या प्रकारांमुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, यामागे काही संघटित टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा तातडीने तपासासाठी कामाला लागली असून विविध मार्गांनी शोध सुरू आहे. एकाच भागातून इतक्या मोठ्या संख्येने महिला बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, सोलापूर जिल्ह्यातील  करमाळ्यातून फक्त १० दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून ५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. महिला बेपत्ता होऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने करमाळा पोलिसही अलर्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व घटनांची गंभीर दखल घेत महिलांना शोधण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. करमाळा पोलिसांनी एक सुचना जारी केली आहे. ” बेपत्ता झालेल्या महिलां महिला किंवा तरुणींबाबत काहीही माहिती मिळाल्यास, त्यांनी त्वरित करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: शेतीला पाणी देण्याच्या वादातून राग निर्माण झाला.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: झोपेत असलेल्या मुलावर लोखंडी गजाने वार करून हत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आईच्या फिर्यादीवरून आरोपी वडिलांना अटक करून तपास सुरू केला.

Web Title: Solapur crime dispute over agricultural water biological father murders son with an iron rodsends shockwaves through madha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.