
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर यांनी बुधवारी दुपारी आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांना खाली उतरवून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
चिठीत आईवर गंभीर आरोप
पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाले. त्या चिठ्ठीत सागर यांनी लिहिले आहे की, “आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कठोर शिक्षा करा.” या मजकुरावरून कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पूर्वी पोलिसांशी झाला होता वाद
अॅड. सागर मंद्रूपकर यांचा काही दिवसांपूर्वी पोलिसांबरोबरही काही वाद झाला होता. हे वादाचं प्रकरण सोलापूर बार असोसिएशनपर्यंत पोहोचले होते. त्या वादामुळे सागर मानसिक ताणाखाली होते का, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी या सर्व बाबींचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण समोर येणे बाकी आहे. तरुण वकिलाने आत्महत्या केल्याने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Ans: वकील
Ans: आईवर
Ans: सोलापूर