Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

सोलापुरातील गावडेवाडी येथील रामदेव डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. ७ लाख रुपयांची सुमारे १८०७ किलो भेसळयुक्त बर्फी जप्त करण्यात आली असून ५११ किलो मिठाई जागेवरच नष्ट करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 26, 2026 | 08:20 PM
सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका (Photo Credit- AI)

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका
  • डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त
  • १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!
सोलापूर, शहर प्रतिनिधी: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचा धडाका कायम असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील एका डेअरीवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ६ लाख ९१ हजार ४४५ रुपयांचा निकृष्ट व भेसळयुक्त बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये एकूण १ हजार ८०७ किलो वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यातील चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

गावडेवाडी येथील महादेव कोरे यांच्या जागेतील रामदेव डेअरी येथे कोणताही अधिकृत परवाना न घेता हा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात उघड झाले. अन्नसुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. शुद्ध दूध किंवा खव्यापासून बर्फी तयार करणे अपेक्षित असताना दुधातील स्निग्धांश काढून त्याऐवजी वनस्पती तूप वापरून मिठाई तयार केल्याचे समोर आले. ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी या मिठाईला खऱ्या बर्फीसारखे स्वरूप देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

हस्तगत केलेला मुद्देमाल

अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा कायदा कलम २६ आणि २७ अंतर्गत ही कारवाई केली. यामध्ये १६३ किलो अजमेरी बर्फी (किंमत २९ हजार ३४० रुपये) आणि ३४८ किलो गोड बर्फी (किंमत ६२ हजार ६४० रुपये) असा एकूण ५११ किलो मिठाईचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. तसेच मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी स्किम्ड मिल्क पावडर आणि वनस्पती तूपही जप्त करण्यात आले.

मिठाईतील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांसाठी टिप्स

थोडी बर्फी किंवा खवा घेऊन त्यात टिंचर आयोडीनचे दोन थेंब टाका. रंग निळा झाल्यास त्यात पिठाची भेसळ असण्याची शक्यता असते. बर्फी हातावर चोळल्यास ती दाणेदार न वाटता गुळगुळीत आणि मेणासारखी वाटत असल्यास त्यात वनस्पती तूप किंवा पामतेलाची भेसळ असू शकते. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार मिठाई दुकानांमध्ये ट्रेमध्ये ठेवलेल्या मिठाईवर ती कधीपर्यंत खाण्यास योग्य आहे, याची माहिती देणे दुकानदारांना बंधनकारक आहे.

आमदार सोपल यांच्या घरावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न; ८ जणांविरोधात गुन्हा, पेटते फटाके फेकून आग लावण्याचा आरोप

Web Title: Solapur fda raids illegal dairy seized adulterated barfi worth 7 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • crime news
  • FDA
  • Solapur

संबंधित बातम्या

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
1

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
2

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई
3

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
4

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.