crime (फोटो सौजन्य: social media )
अकोला जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जावयाचा धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हत्या त्यांच्या सासरवाडीत झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात बुधवारी संध्याकाळी 6:00 वाजता घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पायरुजी गोपनारायण (वय 40, रा. कानशिवनी, ता. अकोला) असे आहे.
मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून; न्यायालयाने पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश गोपनारायण हे त्यांच्या सासरवाडीत अंबाशी येथे गेले होते. यावेळी त्यांच्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी काही नातेवाईकांनी नागेश यांच्यावर धारदार शास्त्र, चाकू आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात नागेश यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमान डोपेवार आणि चान्नी पोलीस ठाण्याचे रवींद्र लांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. सध्या पोलिसांनी मृत नागेश यांची पत्नी छाया हिच्या माहेरच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे अंबाशी गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, घरात कोणीच नसतांना साधली संधी आणि…
दरम्यान, अकोल्या बलात्काराची घटना समोर आली होती. 6 सप्टेंबर (शनिवारी) रोजी दुपारी 4.30 वाजता गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. पीडित मुलीचे आई वडील हे विसर्जन बघायला गेले होते. त्यावेळी आरोपीने याच संधीचा फायदा घेत आरोपी तौहिद बैद याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेननंतर नागरिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शिवसेना (ठाकरे गट) अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी याप्रकरणी एक खळबळजनक घोषणा केली. “जो कोणी या नराधम आरोपीचा एक हात, एक पाय आणि लिंग कापेल, त्याला शिवसेनेच्या वतीने 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ