Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! एक कोटीच्या लाचप्रकरणी GST च्या राज्य कर उपायुक्तासह सहाय्यक कर आयुक्ताला अटक

पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे जीएसटी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 09:57 AM
मोठी बातमी ! 20 लाखांच्या लाचप्रकरणी GST च्या राज्य कर उपायुक्तासह सहाय्यक कर आयुक्ताला अटक

मोठी बातमी ! 20 लाखांच्या लाचप्रकरणी GST च्या राज्य कर उपायुक्तासह सहाय्यक कर आयुक्ताला अटक

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील कार्यवाहीला गती देण्यासाठी १.२५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले. यासाठी पहिल्यांदा 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना राज्य कर विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.

पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे जीएसटी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक राज्य कर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराचे कार्यालय नाशिकमधील दामोदर चौक येथे आहे. आरोपानुसार, जीएसटीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यासाठी पागे आणि दोंदे यांनी तक्रारदाराकडे १.२५ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. नंतर दोन्ही बाजूंमध्ये तडजोड होऊन १ कोटी रुपयांवर सौदा ठरला, ज्यातील पहिला हप्ता २० लाख रुपये द्यायचा होता. शुक्रवारी एसीबीच्या पथकाने पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचला.

हे सुद्धा वाचा : मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने २० लाख रुपये दिले, जे जाधवने पागे आणि दोंदे यांच्यासाठी स्वीकारले. त्याचवेळी एसीबीने जाधवला रंगेहात पकडले आणि त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले.

सहाय्यक फौजदारावर लाचप्रकरणी कारवाई

राज्यासह देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याचे अनेक प्रकरणे आत्तापर्यंत उघडकीस आले आहे. एसीबीकडून तीव्र कारवाई करण्यात येत आहे, तरीही घटना कमी होताना दिसून येत नाही. अशात पुणे जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तपासात मदत करणे, तसेच जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या मुळशीतील पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तडजोडीत तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: State tax deputy commissioner of gst along with assistant tax commissioner arrested in bribe case of rs 20 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Bribe Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?
1

पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू
2

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.