crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बिहार: बिहारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडित दुकानातून सामान घेऊन घरी परतत असतांना आरोपी तरुणाने तिला वाटेतच थांबावल आणि तिला शाळेत नेऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना बिहारमधील हाजीपूर येथील भागवणपूर पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी घडली. पीडिता ही अल्पवयीन १३ वर्षीय मुलगी आहे.
मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…
पीडितेच्या वडिलांनी काय दिली माहिती
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी किराणा दुकानातून सामान घरी परतत होती. त्यावेळी गावातील एका तरुणाने तिला वाटेतच अडवलं आणि पीडितेचं तोंड दाबून तिला जवळच्या सरकारी शाळेत नेलं. त्या ठिकाणी आरोपी तरुणाने पिडीतेसोबत घृणास्पद कृत्य केलं. घटनेनंतर, पीडित तरुणी कशीबशी घरी पोहोचली आणि कुटुंबियांना या प्रकरणासंबंधी माहिती दिली.
तपास सुरु
ठाण्यातील पोलिसांनी पीडितेला वैधकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलं आहे. तेथे पीडित मुलीची तपासणी करण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी तपास सुरु केला. फॉरेन्सिक टीमने सुद्धा सर्व पुरावे गोळा केले आणि यासंबंधी परिसरातील लोकांची सुद्धा चौकशी करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?
प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि तिच्यावर उपचार देखील करण्यात आले आहेत. एफएसएल टीमने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले असून आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या, या प्रकरणासंबंधी आवश्यक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हाकेंच्या अडचणी वाढल्या, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
रात्री पळून गेलेल्या शिक्षिकेचा सकाळी आढळला शेतात मृतदेह
बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतात शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव पुष्पा कुमारी आहे. पुष्पाचा मृतदेह डुमरी रोडवरील सासरच्या घरामागील शेतात आढळला. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील सुपौल बाजार परिसरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, शिक्षिकेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षिका रात्री पळून गेली होती
याप्रकरणात अधिकची माहिती अशी की, मृत शिक्षिका पुष्पा कुमारी ही गौडाबौराम प्रखंडातील गनौनी परसाराम शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. पुष्पाचे माहेर कुशेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिंडुआ गावात आहे. पुष्पाच्या सासऱ्याने सांगितले की ती रात्री घरातून पळून गेली होती. शिक्षिकेचा पती प्रमोद प्रसाद हादेखील जोगरिया येथील सरकारी शाळेत शिक्षक आहे. तर पुष्पाच्या वडिलांनी सांगितले की प्रमोद कुमार शाहू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन दरभंगा येथील डीएमसीएच रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.