crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
ओडिसातील पुरी जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ब्रह्मगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बलिहारीचंडी समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एकाची चौकशी सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शनिवारी दुपारी आपल्या बॉयफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती.त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपींनी या जोडप्याचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. आरोपींनी पीडितेच्या बॉयफ्रेंडला मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
त्यांनतर आरोपी फरार झाले. ही घटना शनिवारी घडली, परंतु बदनामीच्या भीतीने ती तक्रार देण्यास घाबरत होती. पोलिसांनी समजून काढली आणि तिने घडलेला प्रकार सांगितला. आरोपींचे वर्णन देखील तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतण्यास सुरुवात केली.
आरोपींना अटक
पुरीचे पोलीस अधीक्षक प्रतीक सिंग यांनी सांगितले की, सोमवारी सोमवारी ब्रह्मगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 70 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपींकडून त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी पोलिसांच्या भीतीने व्हिडीओ डिलीट केले होते. तरीही पुढील तपासासाठी आणि डेटा रिकव्हरीसाठी हे मोबाईल भुवनेश्वरमधील राज्य फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, अशीच एक घटना बिहार मधून समोर आली आहे. सहा मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील खगारिया येथे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. ही निष्पाप मुलगी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या गुन्ह्याची बळी ठरली. रात्री जेव्हा भयानह शांतता असते तेव्हा काहीजण या अल्पवयीन मुलींला काही बहाण्याने घराबाहेर पडण्यास भाग पडतात. या सहा जणांपैकी एक ओळखीचा मित्र असतो. आणि त्याच मित्राच्या विश्वासावर ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडते. पण या मुलीला माहितं नसतं,तिजा हाच विश्वास तिच्यासाठी घातक ठरू शकतो. कारण तिच्या मित्राने या अल्पवयीन मुलीला त्याच्या दुचाकीवर बसवले आणि गावातील धरणावर घेऊन गेला.
Satara crime: साताऱ्यात भरदिवसा गोळीबार! जुन्या खुनाचा घेतला बदला; दुचाकीवरून आले आणि झाडल्या गोळ्या