सातारा: सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार भर दिवस करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अपघात इतका भीषण की…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार ज्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्याचे नाव रियाज उर्फ मन्या इकबाल शेख असे आहे. तो या गोळीबारामध्ये जखमी झाला आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
२०१६ मध्ये प्रतीक चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. याचाच बदला घेण्यासाठी रियाजवर गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा आता शिरवलमध्ये सुरू झाली आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची चर्चा सुरु आहे. या गोळीबारामध्ये रियाज शेख हा किरकोळ जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांचा शोध शिरवळ पोलीस घेत आहेत. २०१६ मध्ये प्रतीक चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी म्हणून रियाज शेखला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. वाई कोर्टामध्ये केस सुरु आहे. आता त्याच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बदला घेण्याचा नवीन ट्रेंड
दरम्यान ५ सप्टेंबर रोजी पुण्यात आयुष कोमकर या तरुणावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बंडू आंदेकर याचा जावई आणि वनराज आंदेकर याच्या हत्यातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (18) याची हत्या करण्यात अली. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हा गोळीबार करण्यात आला. या घटनेने परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ताजी असतांना आता साताऱ्यात गोळीबार झाला. या प्रकरणाने बदला घेण्याचा नवीन ट्रेंड सुरु झालाय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. भरदिवसा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.