डोंबिवलीतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने आधी एका शिक्षिकेला फसवले त्यानंतर त्यांना मुलं झालं नंतर तिला सोडून दिले. त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं मात्र ते लग्न टिकले नाही ती माहेरी परत गेली. नंतर पुन्हा एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिलाही फसविले. या शिक्षकाच्या धक्कादायक प्रकाराने डोंबिवली हादरली आहे. पोलिसांनाही या शिक्षकाला अटक केली आहे. राहुल तिवारी असे या शिक्षकाचे नाव आहे. तो उल्लासनगर येथील एका प्रतिष्ठित शाळेत कार्यरत आहे. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
‘खुनाचा बदला खुनाने’ घेण्याचा डाव फसला; शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार, दुचाकीवरून दोघे आले अन्…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, राहूल तिवारी याच्यावर २०११ पासून वेगवेगळ्या महिलांना फसवल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात एका शिक्षिकेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, राहुलचे या शिक्षिकेसोबत गेल्या १४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्यांना एक मूल झाले. मात्र, मूल झाल्यानंतर राहुलने तिला सोडून दिले आणि दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले. त्यानंतर राहुलचे हे लग्न काही दिवसच टिकले. त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने ती त्याला सोडून माहेरी निघून गेली. यानंतर राहुलने तिसर्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिलाही फसविले.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणी एका शिक्षिकेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी राहुल तिवारीला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, पोलिसांनी त्याच्याकडून आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे याची चौकशी करत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बनावट सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात १०.३३ लाखांचा हार घेऊन भामटा पसार
डोंबिवली येथून एक फसवणुकीची मोठी बातमी समोर आली आहे. बनावट सोनाच्या नाण्यांच्या बदल्यात तब्बल १० लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कंठीहार घेऊन आरोपी पसार झाला आहे. यामुळे दुकानदाराला लाखोंचा गंडा घातला गेला आहे. ही घटना डोंबिवली पूर्वमधील टिळक रस्त्यावर असलेल्या श्री देवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भर दिवस झालेल्या या घटनेने डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस करत आहे. शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
Satara crime: साताऱ्यात भरदिवसा गोळीबार! जुन्या खुनाचा घेतला बदला; दुचाकीवरून आले आणि झाडल्या गोळ्या