
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार रोशनी आणि ज्योत्स्ना या दोघी रामी पार्क सोसायटीत वास्तव्यास होत्या. दररोज एकत्रच दोघी कॉलेजला जात होत्या. घटनेच्या दिवशी कॉलेजची वेळ संपूनही त्या घरी परतल्या नाही. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दोघीनींही फोन उचलले नाहीत. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात करत मोबाईल लोकेशनचा शोध घेण्यास सुरुवात केली.
DTC च्या अनियंत्रित बसने थेट 3 जणांना उडवले; जमावाने थेट आगच लावली अन्…, Video Viral
बाथरूममध्ये पडलेले आढळले
मोबाईल सर्व्हिलन्सच्या मदतीने तपास केला असता दोन्ही मुलींचे लोकेशन सनिया कणदे येथील स्वामीनारायण मंदिर परिसरात दाखवत होते. पोलीस आणि मुलींचे कुटुंबीय तातडीने मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा त्यांची तिथे मोपेड उभी असलेली आढळली. मात्र मुलींचा कुठेच पाट लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या दोघी मंदिरातील बाथरूमच्या दिशेने जातांना दिसल्या. बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला आणि पोलिसांनी तो तोडला असता दोघींचे मृतदेह तिथे पडलेले आढळले.
शवविच्छेदनानंतर समोर येईल कारण
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना मृदेहांच्या शेजारी क्लोरोफॉर्मची एक भरलेली आणि एक रिकामी बाटली तसेच इंजेक्शनची सिरिंज सापडली आहे. या दोन्ही मुलींनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य एफएसएलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
धक्कदायक माहिती
पोलिसांनी मुलींच्या मोबाईलची तपासणी केली असता धक्कदायक माहिती समोर आली आहे. या मुलींनी आत्महत्येसाठी ChatGPT चा वापर केला. कोणत्या विषाचा वापर करावा आणि ते कसे घ्यावे याची माहिती चॅट जीपीटीवर शोधली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या मोबाईलमध्ये डिंडोली परिसरातील एका अन्य मुलीच्या आत्महत्येची प्रेस नोट देखील सापडली आहे ज्या मुलीने भूल देणारे औषध घेऊन आत्महत्या केली होती. या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहे.
Ans: ही घटना सुरत शहरातील दिंडोली परिसरातील स्वामीनारायण मंदिरात घडली.
Ans: रोशनी शिरसाठ आणि ज्योत्स्ना चौधरी या दोघी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि बालपणीच्या मैत्रिणी होत्या.
Ans: मुलींच्या मोबाईल तपासात आत्महत्येची पद्धत जाणून घेण्यासाठी त्यांनी ChatGPTवर शोध घेतल्याचे समोर आले.