दिल्लीत बसने अनेकांना उडवले (फोटो- ट्विटर)
डीटीसीच्या बसने अनेकांना उडवले
ई रिक्शा आणि स्कूटरला दिली धडक
नागरिकांनी बस दिली पेटवून
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीमध्ये एका बसने अनेकांना उडवल्याची घटना समोर आली आहे. डिटीसीची बस जी अत्यंत वेगाने जात होती त्या बसने अनेकांना धडक दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन लोकांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटना घडल्यावर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी बसची तोडफोड केली आणि तिला आग लावली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
गर्दीने बसला लावली आग
नांगलोईमध्ये या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड राग दिसून आला. संतप्त असलेल्या जमावाने बसची तोडफोड केली आणि बसला आग लावली. मागून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक बसेसना थांबवून त्यांची देखील तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली में नांगलोई-नजफगढ़ रोड पर DTC बस ने ई-रिक्शा और एक स्कूटर को टक्कर मार दी, जिसमें तीन लोगों की जान चली गई DTC बस एक्सीडेंट से 3 की मौत, गुस्साई भीड़ ने बस में आग लगा दी#DelhiNews #Delhi @DelhiPolice pic.twitter.com/rRgen5Rsmk — Gaurav Kumar (@gaurav1307kumar) March 9, 2026
डीटीसी बस चालकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग
राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर भागात ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पाणी मागण्याचा बहाणा करुन त्याने तरुणीचा विनयभंग केला आहे. पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, सध्या रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे हा तरुणीच्या घरी आला. तरुणीने ऑनलाइन खरेदी केली होती. वस्तू देत असताना त्याने तरुणीकडे पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. तेव्हा ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’, असे कांबळे म्हणाला. कांबळेच्या वर्तनामुळे तरुणी घाबरली. तिने आरडाओरडा केला. कांबळे तेथून पसार झाला.






