Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यवसायासाठी सावकाराकडून कर्ज घेणं पडलं महागात; कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सह्या घेतल्या अन्…

तक्रारदार अनिता खैरात यांचा साड्या विक्रीचा व्यवसाय असून व्यवसायासाठी भांडवलाची गरज भासल्याने त्यांनी २०२४ मध्ये संशयित आरोपी भाऊसाहेब बोरगुडे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 03:40 PM
मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

Follow Us
Follow Us:

निफाड : व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशांवर अवाजवी व्याजाची मागणी करत, जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या एका इसमाविरुद्ध निफाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिता सुनील खरात (वय ३६, रा. गायत्री नगर, निफाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाऊसाहेब पंडित बोरगुडे (रा. नैताळे, ता. निफाड) याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिता खैरात यांचा साड्या विक्रीचा व्यवसाय असून व्यवसायासाठी भांडवलाची गरज भासल्याने त्यांनी २०२४ मध्ये संशयित आरोपी भाऊसाहेब बोरगुडे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. खरात यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी घेतलेल्या कर्जापोटी मुद्दल आणि व्याजासह मोठी रक्कम वेळोवेळी परत केली होती. मात्र, आरोपीने अधिक पैशांची मागणी लावून धरली होती. काही रक्कम परत करण्यास उशीर झाल्याने आरोपीने तक्रारदार आणि त्यांच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच, व्याजाच्या पैशांसाठी तक्रारदाराकडून काही कोऱ्या कागदपत्रांवर आणि चेकवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, कर्जाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी पीडितेवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला होता.

या जाचाला कंटाळून अखेर खरात यांनी निफाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८, ३५१ (२), ३५२ आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५, ४८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे निफाड परिसरातील अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुबईतील कंपनीकडून व्यापाऱ्याला गंडा

द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने एक कोटी ३६ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुबई, पाकिस्तानातील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौर्णिमा विजय पाटील (वय ४२, रा. उत्तर शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली.

Web Title: Taking a loan from a moneylender for business proved costly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Fraud Case
  • Nashik News

संबंधित बातम्या

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा
1

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
2

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.