Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांचा विनाश होईल…’ १०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार, आईचा आक्रोश, प्रकरण काय?

Tamilnadu News : तामिळनाडूमधील एका २६ वर्षीय दलित तरुणाच्या कथित पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. तब्बल १०१ दिवस मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर आणि मानवाधिकारांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 03:14 PM
'माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांचा विनाश होईल...' १०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार, आईचा आक्रोश, प्रकरण काय?

'माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांचा विनाश होईल...' १०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार, आईचा आक्रोश, प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडूमध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या २६ वर्षीय तरुणावर तब्बल १०१ दिवसांनी कडेकोट सुरक्षेत अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • कुटुंबीयांनी संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करत तीन महिने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता.
  • प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे या घटनेने पुन्हा गंभीर वळण घेतले आहे.
तामिळनाडूतील मदुराई येथे पोलिसांकडून केलेल्या कथित छळानंतर २६ वर्षीय दलित तरुणाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. १०१ दिवस मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर बुधवारी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशांनंतर, मदुराई येथील विद्युत स्मशानभूमीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे आता पोलिस जबाबदारी आणि मानवाधिकार उल्लंघनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गे डेटिंग अ‍ॅप ठरलं सापळा! भेटायला बोलावलं, निर्जन खोलीत 7 जण वाट पाहत होते; पुढे जे घडलं ते धक्कादायक

कुटुंबाने केली पोलिसांवर कारवाईची मागणी

मृत तरुणाचे नाव आकाश असून त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाने सलग तीन महिने मृतदेहाला शवागृहातून नेण्यास नकार दिला. कुटुंबीयांनी कथित पोलीस कोठडीतील हत्येमध्ये सामील असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तथापि, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेर आकाशचे अंतिम संस्कार पार पाडण्यात आले.

काय आहे प्रकरण?

शिवगंगा जिल्ह्यातील मानामदुरै येथील रहिवाली आकाशला स्थानिक पोलिसांनी ६ मार्च रोजी मारहाणीच्या प्रकरणात अटक केली. पोलिसांचा दावा होता की, पळण्याचा प्रयत्न करत असताना आकाशचा पाय फॅक्चर झाला. दुसरीकडे आकाशने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दाखल करून, पोलिसांनी आपल्याला निर्दयपणे मारहाण करून आपला पाय मोडल्याचा आरोप केला. यानंतर ८ मार्च रोजी मदुरैच्या सरकारी राजाजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम रिपोर्टने केलं थक्क

आकाशच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. यानंतर जे रिपोर्ट्स समोर आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. आकाशच्या शरीरावर २८ जखमा होत्या. खुलाशाने अनुसूचित जाती कल्याण संघटना आणि कुटुंबीयांकडून तीव्र आंदोलने सुरू झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, ९ मार्च रोजी तपास सीबी-सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकरणानंतर एका निरीक्षक आणि उपनिरक्षकाला निलंबित करण्यात आले.

या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने १३ मार्च रोजी सीबी-सीआईडीला आरोपी अधिकाऱ्यांविरोधात हत्या आणि अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यासोबतच ११ पोलिस अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात आली. यादरम्यान पिडित मुलाचे वडिल राजेश कन्नन यांनी उच्च न्यायालयाकडे ५० लाखंची भरपाई आणि १७ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने मानामदुरैच्या जुन्या बसस्थानकाजवळ आंदोलने देखील केली.

Nashik Crime: कन्नमवार पुलाखालील आढळला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; प्रेमसंबंधातून हत्येचा संशय

न्यायालयाने दिला आदेश

वाद मिटवण्यासाठी उच्च न्यायालयाने १५ जून रोजी आदेश दिला की संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जर कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला नाही तर सम्मानजनक पद्धतीत स्थानिक प्रशासन त्याचे अंतिम संस्कार करेल. कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने मदुरैचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर अंतिम संस्काराची जबाबदारी सोपवली. स्मशानात अंत्यविधी सुरु असताना गंभीर वातावरण निर्माण होते. आकाशची आई मुलाच्या मृत्यूवर प्रचंड रडली. तिने मूठभर वाळू हातात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांवर फेकली आणि शाप दिला की, तिच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेले एके दिवशी पूर्णपणे नष्ट होतील.

Web Title: Tamil nadu custodial death dalit youth cremated after 101 days mother demands justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime news
  • Crime Police
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्…
1

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्…

गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अ‍ॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले
2

गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अ‍ॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण
3

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर
4

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.