
crime (फोटो सौजन्य: social media)
तामिळनाडू: तामिळनाडूतून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. आईनेच ५ महिन्यांच्या पोटच्या पोराची हत्या केल्याचे समोर आले आहे. आईने हे का केलं? तिने आपल्याच पोराचा जीव का घेतलं? याचा कारण ऐकून तुम्हालाच काय पोलिसांनाही धक्का बसला आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया.
Nanded Crime: नांदेड हादरलं! शिकवणीतून परतणाऱ्या ६ वर्षांच्या चिमुलीचे तोडले लचके, फाशीची मागणी
लग्नानंतर तरुणीसोबत सुरु होते प्रेमसंबंध
तमिळनाडूतील केलमंगलम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय भारतीचे लग्न सुरेश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. दोघांना दोन मुली आणि एक मुलगा होता. पण लग्न झालेले असूनही भारतीचे तिच्या परिसरातीलच एका तरुणी सुमित्रा (२२) सोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती कामावर गेल्यावर भारती सुमित्राच्या घरी जायची. दोघींमध्ये इतके चांगले नाते होते की त्यांनी एकमेकांच्या नावाचे टॅटूही काढले होते.
मुलाच्या जन्मानंतर बिगडूलागले नाते
भरतीचे लग्न झाल्याने तिला एक मुलगा झाला. यानंतर भरती आणि सुमित्रामध्ये भांडणे वाढू लागली. सुमित्राला वाटत होते की मुलं त्यांच्या नात्यात अडथळा ठरत आहे. याच कारणावरून दोघींमध्ये अनेकदा भांडणे झाली. एक दिवस रागात येऊन भरतीने आपल्या मुलाचा गळा दाबला. नंतर तिने कुटुंबाला सांगितले की दूध पाजताना मुलाचे डोके आपटले आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाने तिच्यावर विश्वास ठेवला आणि मुलाचे अंत्यसंस्कार केले.
कसे आले सत्य समोर ?
काही दिवसांनंतर भारतीच्या पती सुरेशला तिच्या फोनमध्ये काही व्हिडीओ आणि फोटो सापडले, ज्यात भरती आणि सुमित्राचे खाजगी क्षण रेकॉर्ड होते. तेव्हा सत्य समोर आले. सुरेशने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सर्व पुरावे सुपूर्द केले. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली आहे. पोलीस तपास करत आहे.
धक्कादायक ! लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणावरून मुलाने बापालाच संपवलं; आधी वाद घातला अन् नंतर…
Ans: तमिळनाडू
Ans: भारती
Ans: सुमित्रा