
crime (फोटो सौजन्य: social media)
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, संतप्त माहेरच्यांनी सासरच्या घरासमोरच आपल्या लेकीची चिता पेटवून संताप व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक ! लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणावरून मुलाने बापालाच संपवलं; आधी वाद घातला अन् नंतर…
आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव मोहिनी चंद्रकांत अहिरे असे असून, तिला सासरकडून सतत मोबाईल, गाडी आणि माहेरहून पैसे आणण्याचा दबाव आणला जात होता. या वारंवार मागण्यांमुळे सासरी नेहमी वाद, शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे उघड झाले आहे. अखेर या सततच्या जाचाला कंटाळून मोहिनीने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
सासरच्या दारातच पेटवली चिता
घटनेची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन सासरी धाव घेतली आणि सासरच्यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात माहेरच्यांनी आपल्या लेकीची अंत्यसंस्कार विधी सासरच्या दारातच करून संताप व्यक्त केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी मोहिनीच्या पतीसह सहा जणांविरोधात चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
ही घटना पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते, जिथे हुंड्याच्या मागणीमुळे एका नववधूने आत्महत्या केली होती. लग्नात आलिशान कार गिफ्ट दिल्यानंतरही तिला सासरच्या छळाला सामोरे जावे लागले होते. मोहिनी अहिरे प्रकरण हे त्या घटनेचीच पुनरावृत्ती असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सासरकडून होणाऱ्या छळामुळे विवाहित महिलांच्या आत्महत्या थांबत नाहीत, हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. आता असा प्रश्न उपस्थित होतो की — या निर्दयी प्रथांचा शेवट नेमका कधी होणार?
Nanded Crime: नांदेड हादरलं! शिकवणीतून परतणाऱ्या ६ वर्षांच्या चिमुलीचे तोडले लचके, फाशीची मागणी
Ans: नाशिक
Ans: मोहिनी
Ans: सहा