Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बाॅस फेम तान्या मित्तलच्या अडचणींमध्ये वाढ, सोशल मिडिया इन्फ्लुएंसरने लावले गंभीर आरोप

Tanya Mittal : बिग बाॅस फेम तान्या मित्तलवर सोशल मिडिया इन्फ्लुएंसर फैजान अंसारीने गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जीवाचे काही बरेवाईट झाले तर यासाठी तान्या मित्तल आणि तिच्या कुटुंबाला दोषी ठरवावे असेही तक्ररादाराने पोलिसांना सांगितले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 10:03 AM
बिग बाॅस फेम तान्या मित्तलच्या अडचणींमध्ये वाढ, सोशल मिडिया इन्फ्लुएंसरने लावले गंभीर आरोप

बिग बाॅस फेम तान्या मित्तलच्या अडचणींमध्ये वाढ, सोशल मिडिया इन्फ्लुएंसरने लावले गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने धमक्यांचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली.
  • पुरावे सादर करत स्वतःच्या सुरक्षेचीही मागणी करण्यात आली.
  • पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तांत्रिक तपास सुरू केला आहे.
सोशल मिडिया इन्फ्लुएंसर फैजान अंसारीने बिग बाॅस फेम तान्या मित्तलवर गंभीर आरोप लावत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार ग्वालियर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तान्या मित्तलकडून पूर्वीची तक्रार मागे घेण्यासाठी सतत धमकी दिली जात असल्याचा आरोप यात लावण्यात आला आहे. तक्ररदाराचा आरोप आहे की, देश-विदेशातील वेगवेगळ्या नंबरवरुन त्याला धमकीचे फोन येत आहेत. या प्रकरणात पिडित फैजान याने एसएसपी कार्यालयात पोहचून तक्रार दाखल करत सुरक्षेची मागणी केली आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील ‘या’ भागात केला गेला केतनला ढकलण्याचा सराव; सियाच्या सोबतीने स्पॉट पंचनामा

फैजानचा तान्या मित्तलवर आरोप

मुंबईतील रहिवाशी फैजान हा एक सोशल मिडिया इन्फ्लुएंसर असून त्याने पूर्वी तान्या मित्तलविरोधात तक्रार दाखल केली होती. हिच जुनी तक्रार मागे घेण्यासाठी त्याला धमकीचे फोन काॅल्स येत असल्याचा आरोप फैजानला लावला. त्याने म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास आधीच सुरू आहे आणि या तपासाच्या संदर्भात त्याचा जबाब नोंदवण्यासाठी त्याला बोलावण्यात आले होते. आरोपानुसार, फोन करणारे व्यक्ती पूर्वीची तक्रार मागे घेण्यासाठी त्याला धमकी देतात आणि त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. फैजानने सांगितले की, यापूर्वीही त्याने याची माहिती पोलिसांना दिली होती.

माझ्या जीवाला धोका…

फैजान अंसारीनुसार, २ जुलै रोजी त्याला ग्वालियरच्या विश्वविद्यालय पोलिस ठाण्यात जबाव देण्यासाठी बोलावण्यात आले. त्याने सांगितले की, यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. यादरम्यान त्याने कथित फोन रेकाॅर्डिंग, मोबाईल डेटा आणि इतर पुरावे देखील पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याने दावा केला की, उपलब्ध फोन रेकाॅर्डिंगमधून पुन्हा पुन्हा तान्या मित्तलचे नाव समोर येत आहे. फैजानने तक्रारीत आपल्या सुरक्षेविषयीही चिंता व्यक्त केली. येत्या काळात जर त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्यासाठी तान्या मित्तल आणि तिच्या कुटुंबाला दोषी ठरवावे असेही त्याने सांगितले. फैजानने पोलिसांकडे निष्पक्ष तपासाची आणि सुरक्षा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

पोलिसांचा तपास सुरु

या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सर्व पुराव्यांना ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिस सर्व पुराव्यांची तांत्रिक तपासणी करत आहे. या तपासानंतरच आरोपांची सत्यता आणि पुढील कायदेशीर कारावाई स्पष्ट होईल. तान्या मित्तलवर लावण्यात आलेले हे आरोप तक्रारदाराच्या दाव्यांवर आधारित आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

Web Title: Tanya mittal controversy social media influencer faizan ansari files police complaint alleges threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • crime news
  • Police Case
  • tanya mittal

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.