Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Crime: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा काटा काढला; 15 वर्षांच्या संसाराचा थरारक शेवट

तेलंगणातील कामारेड्डी येथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी अपघाताचा बनाव रचण्यात आला होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलिस तपासातून हा कट उघडकीस आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 12:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.
  • इन्शुरन्सच्या पैशांसाठी अपघाताचा बनाव करण्यात आला.
  • पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तांत्रिक पुराव्यांमुळे हत्या उघड झाली.
तेलंगणा: तेलंगणा येथून एक थरारक हत्याकांड समोर आलं आहे. लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर दोन मुलांची आई असलेल्या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा सगळं प्रकार तिने पतीच्या इन्शुरन्सचे पैसे हडप करण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. (Telangana Crime) महिलेने पतीच्या हत्येला अपघाताचं रूप देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसात तशी तक्रारही नोंदवली. मात्र पोलिसांनी या कटाचा खुलासा केला. हा प्रकार तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिवनगर मंडळाच्या मारकल गावात घडली.(Telangana Crime)

Pune Crime : तरुणाकडून दहा लाखांचा गांजा जप्त; रेंजहिल्स परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपी महिलेचे नाव रेणुका असे आहे तर गंगाशेखर असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. या प्रकरणातील मृतकाचे नाव कांचरला राजायाह (४५) असे आहे. रेणुकाने २२ मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, तिचा पती कांचरला राजायाह रात्रीच्या वेळी आपल्या शेतात जात असताना त्याचा अपघात झाला. यात त्याचा मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक एक प्राणी समोर आल्याने राजायाह यांचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याचा दावा तिने केला.(Telangana Crime)

पूर्वनियोजित हत्या…

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान या अपघाताबाबत पोलिसांना संशय आला. अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. सीसीटीव्ही फुटेज, साक्षिदारांचे जबाब, तांत्रिक डेटा आणि महत्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सगळ्यातून एक वेगळीच माहिती समोर आली. (Telangana Crime) मृतदेहावरील जखमा या रस्ते अपघातासारख्या नव्हत्या. पोस्टमॉर्टम आणि तांत्रिक पुराव्यांवरून हे स्पष्ट झालं की, ही एक पूर्वनियोजित हत्या होती. असे डीएसपी श्रीनिवास राव यांनी सांगितले.

आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीच्या तपासाला सुरुवात केली. गंगाशेखर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. अखेर त्याने केलेला गुन्हा कबूल केला. गंगाशेखर याचे गेल्या चार वर्षांपासून रेणुकासोबत अनैतिक संबंध होते. पतीचा काटा काढल्यास आपल्या प्रेमातील अडथळा दूर होईल आणि सोबतच इन्शुरन्सचे पैसेही मिळतील, असा विचार करून त्या दोघांनी कट रचला आणि कांचरला राजायाह याची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहे. (Telangana Crime)

Gujarat Crime: भाचीशी बोलणाऱ्या तरुणांना कारने उडवलं; CCTVमुळे कट उघड, दोघे मामा अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील मारकल गावात ही घटना घडली.

  • Que: पतीच्या हत्येमागचं कारण काय होतं?

    Ans: पत्नीला प्रियकरासोबत राहायचं होतं आणि पतीच्या इन्शुरन्सचे पैसे मिळवायचे होते.

  • Que: पोलिसांनी कटाचा उलगडा कसा केला?

    Ans: पोस्टमॉर्टम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.

Web Title: Telangana crime wife conspires with lover to eliminate husband a shocking end to 15 years of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Gujarat Crime: भाचीशी बोलणाऱ्या तरुणांना कारने उडवलं; CCTVमुळे कट उघड, दोघे मामा अटकेत
1

Gujarat Crime: भाचीशी बोलणाऱ्या तरुणांना कारने उडवलं; CCTVमुळे कट उघड, दोघे मामा अटकेत

Uttarpradesh Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक
2

Uttarpradesh Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक

Palghar Crime: भरदिवसा तरुणीवर हल्ला करून फरार, आरोपीचे आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले; अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Palghar Crime: भरदिवसा तरुणीवर हल्ला करून फरार, आरोपीचे आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले; अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत
4

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.