Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाजवळ रस्त्यातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरल्याने 46 वर्षीय सुनिता पाल यांचा मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पतीला दुखापत झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेनंतर रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 03, 2026 | 08:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरल्याने 46 वर्षीय महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.
  • अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
  • घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याची आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी केली.
ठाणे: ठाणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे.
राहणाळ गावाजवळ रस्त्यातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरल्यानंतर 46 वर्षीय महिलेचा मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून, या घटनेनंतर रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

काय घडलं नेमकं?

या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सुनीता अक्षयलाल पाल (वय 46) असे आहे. ती पाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचे पती अक्षयलाल पाल यांच्यासह त्या भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. त्यावेळी राहनाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेली आणि घसरली. अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला पडले. मात्र सुनीता या रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदे शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत, तसेच दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव

ठाणे येथून एक सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला एक २६ वर्षीय तरुण बळी पडला. या तरुणाची तब्बल 1.36 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी शिताफीने जाळे विणून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाजवळ.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरल्याने अपघात झाला.

  • Que: या घटनेनंतर काय कारवाई सुरू आहे?

    Ans: नारपोली पोलीस तपास करत असून नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Thane accident pothole proves fatal woman dies on the spot after her two wheeler skids and she is crushed under a truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.