संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमास नकार दिल्याच्या रागातून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या तरुणाने भररस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करित मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिच्यासह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.
हा प्रकार २० ऑक्टोबर २०२४ ते २५ जुलै २०२६ दरम्यान घडला आहे. रोहन गायकवाड (वय २१, रा. भिमपुरा, उस्मानुपरा) असे विद्यार्थिनीचा पाठलाग करुन तिला मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १७ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. पीडिता ही बारावीचे शिक्षण घेत आहे. दहावीत शिकत असताना वर्गातील मित्राच्या माध्यमातून तिची रोहन गायकवाड याच्याशी ओळख झाली होती. पीडिता ही शाळेतून घरी जात होती, त्यावेळी रोहण याने पीडितेला रस्त्यात अडवले व मला तुझ्या सोबत मैत्रीच्या नात्याने बोलायचे आहे, मला तुझी इन्स्टा आयडी दे अशी मागणी केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…
घाटी परिसरातून महिलेचे अपहरण
इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. ३५ वर्षीय विवाहिता पतीसह मजुरी करून उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वी ऊसतोडीच्या कामासाठी गंगापूर येथे गेल्यानंतर तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्राम व मोबाइलवरून संपर्क सुरू होता. १५ जुलै रोजी पीडितेचा सावत्र भाऊ उपचारासाठी घाटीत दाखल असल्याने पीडिता तेथे गेली होती. रात्री नऊच्या सुमारास आरोपीने फोन करून आपण घाटीतच असल्याचे सांगितले. काही वेळाने पीडिता पिण्याचे पाणी आणण्यासाठी खाली गेल्यानंतर आरोपी तेथे आला. आपले फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन, अशी धमकी देत त्याने पीडितेला सोबत येण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने पीडितेचा मोबाइल हिसकावून घेतला. दुचाकीवर बसवून रात्रभर प्रवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पवनचक्क्या असलेल्या परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे तु माझ्या सोबत लग्न कर असे म्हणून त्याने पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. पीडितेने नकार देत विरोध केला माञ आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.






