पुणे: हिंजवडी आयटी परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी डंपरच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने हिंजवडीतील एका २० वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचे वडील गंभीर जखमी आहे. मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे आहे. पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे.
कसा झाला अपघात ?
मृत तन्वी ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीच्या दिशेला जात होती. यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिली. यावेळी डंपरच्या चाकाखाली येऊन तन्वीचा मृत्यू झाला. अपघातात तिचे वडील जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.
डंपरचालक फरार
अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार झाला. मात्र सायंकाळच्या सुमारास फरार आरोपी अजय ढाकणे (वय २०, रा. जांबे)याला पोलिसांनी बेड्या ठोकले. आयटी नगरी हिंजवडी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. आता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे हादरलं! मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं; कारण काय?
पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे. ही हत्या का करण्यात आली, या मागचं कारण काय? चला जाणून घेऊयात.
काय घडलं नेमकं?
समोर आलेल्या माहितीनुसार, अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर इथे साडेपाच ते ६ वाजण्याच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
Ans: डंपर
Ans: तन्वी
Ans: हिंजवडी






