
crime (फोटो सौजन्य: social media)
गोरक्ष शामराव पाटील असे जावयाचे नाव आहे. गोरक्ष पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू वाडी येथे राहण्यास आहे. गोरक्ष याचा विवाह ठाणे कळवा येथील घोलाई नगर येथे राहणारे पांडुरंग तलार यांची कन्या आश्विनी हिच्यासोबत २०१४ मध्ये झाला. गोरक्षला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नीला मारहाण व छळ करीत होता. पतीच्या जाचाला कंटाळून अश्विनी ही कळवा येथे माहेरी निघून आली होती, व ती आईकडे राहण्यास होती, व नोकरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ करीत होती. ५ महिन्यांनी गोरक्ष हा सासरी आला आणि त्याने सासू सासऱ्याकडे हातपाय जोडून माफी मागितली आणि तो पत्नीसोबत कळवा येथेच घर भाड्याने घेऊन राहत होता. काही महिने व्यवस्थित राहिल्यानंतर त्याने पुन्हा दारू पिऊन पत्नीला त्रास देऊ लागला.
शिवीगाळ, करत धमकी दिली
मेव्हणे अर्जुन तलार याने गोरक्षला घरातुन बाहेर राहण्यास सागीतले असता गोरक्षने कुटंबातील व्यक्तींना जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तो मुळ गावी कोल्हापुर येथे निघुन गेला. २० डिसेंम्बर रोजी सकाळी आश्विनी ही मोटारसायकलने कामावर जात असताना गोरक्ष हा हातामध्ये लाकडी फळी घेवुन आला व त्याने पत्नी आश्विनी हिची वाट अडवून धमकी दिली. पत्नीच्या बोलण्याचा राग येवुन तो त्याच्या हातातील लाकडी फळी घेवुन तो मला मारण्याकरीता पुढे येत असताना रिक्षा चालकांनी पुढे येवुन आश्विनीला त्याच्यापासुन दुर ठेवले व तीला तेथुन जाण्यास सांगीतले. त्यावेळी गोरक्ष याने जाताना शिवीगाळ करून धमकी दिली आणि तो तेथुन पळुन गेला.
लाकडी फळीने केली मारहाण
गोरक्ष हा हातात लाकडी फळी घेऊन सासुरवाडीला आला आणि त्याने सासू प्रतीक्षा पांडुरंग तलार (५९) आणि सासरे पांडुरंग तलार (६०) यांना लाकडी फळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रतीक्षा आणि पांडुरंग या वृद्ध दाम्पत्याना मुंबईतील जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी जावई गोरक्ष पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
Ans: पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग आणि दारूचे व्यसन.
Ans: 59 वर्षीय सासू आणि 60 वर्षीय सासरे गंभीर जखमी झाले.
Ans: कळवा पोलिसांनी जावयावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.