crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार आणि तलवारीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे तर दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हि घटना उल्लासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
Uttar Pradesh: 4 वर्षांच्या लेकराला आधी विष दिला, नंतर पती-पत्नीने घेतला गळफास; कारण काय?
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. गोळीवबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हिललाइन पोलिसांकडून सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार. आरोपी आणि पीडित कुटुंबातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. सोमवारी रात्री अचानक तणाव वाढला आणि आरोपींनी शास्त्रांचा वापर करून हल्ला केला. यामध्ये एका व्यक्तीवर गोळीवर करण्यात आला आहे. तर दुसऱ्याला तलवारीने वार करून जखमी केले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला तात्काळ ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या जखमीवरही उपचार सुरू आहेत.
संतापजनक! जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईपने बेदम मारहाण
बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींवर लोखंडी पाईप व रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना चऱ्हाटा या गावात घडली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पाईप आणि रॉडने अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव शेख रिजवाना बबनीन व शेख निलफोर, शेख हरून असे आहे. गावातल्याच चार ते पाच जणांनी संगनमत करून मारहाण केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र संपूर्ण प्रकार पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला अधिक सक्रिय राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलेसोबत बळजबरी; दागिन्यांसह रोकडही लुटली