उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आधी स्वतःच्या ४ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला नंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणातून या व्यापारी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांनी मुलाला विषारी पदार्थ खायला दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली असून घटनास्थळी त्यांना एक सुसाईड नोट भेटली.
सुसाइट नोटमध्ये काय?
व्यापारी दाम्पत्यांनी आत्महत्या करण्या आधी सुसाईड नोट लिहून ठेवले. माझ्यावर खूप कर्ज झालंय, त्यामुळे मी खूप त्रस्त आहे. मी अनेकांकडून कर्ज घेतलंय. मात्र काहीच उत्पन्न मिळत नाही. अशात मी मानसिकदृष्ट्या खूप त्रासलोय. सुसाइड नोटमध्ये लिहिलं, माझी नातेवाईकांविरोधात काहीच तक्रार नाही. सर्वांनी मला साथ दिली. आमचं घर, कार आणि इतर काही गोष्टी विकून कर्ज फेडा, असं सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.
ही घटना कशी उघडकीस आली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या हातमाग व्यापारीचं नाव सचिन ग्रोव्हर (30), त्यांची 28 वर्षीय पत्नी शिवानी आणि 4 वर्षीय मुलगा फतेह असे आहे. त्यांचे मृतदेह घरात आढळेल. या जोडप्याने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली, तर फतेहचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळला. मृतकाचे कुटुंब घराच्या दुसऱ्या आणि खालच्या मजल्यावर राहतात. बुधवारी सकाळी कुटुंब वरच्या मजल्यावर गेले तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
संध्याकाळी पैसे बँकेत जमा करायचे असल्याचे सांगितले
मृतक सचिन ग्रोव्हरच्या आईने सांगितले की, सचिनने काल संध्याकाळी तीला सांगितले होते की, त्याला ५ लाख रुपये बँकेत जमा करायचे आहेत आणि तीन लाख रुपयांची सोय करण्यात आली आहे. मात्र रात्रीतून तिघांच्या मृत्यूने आईला जबर धक्का बसला आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.
फक्त मुगाच्या शेंगा तोडल्याने धाकट्याने केला मोठ्या भावाचा खून
यवतमाळ येथे सख्ख्या भावानेच आपल्या थोरल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शेतातील मुगाच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून या भावंडांमध्ये भांडण झालं होतं. अखेर याचं पर्यावसन खुनात झालं.
नीलेश अशोक रिंगे (वय ३५, रा. माळकिन्ही) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे तर प्रदीप अशोक रिंगे (वय ३०, रा. माळकिन्ही) असे त्याच्या मारेकरी भावाचे नाव आहे. शेंगा तोडल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावावरच वेळवाच्या काठीने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी पडला. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही शेतशिवारात मंगळवारी (दि. २६) घडली.
Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश