Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नंदुरबारमधील अल्पवयीन मुलीवर अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना घेतलं ताब्यात, वाचा संपूर्ण प्रकरण

नंदुरबादमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन बालिकाचे अपहरण करून तिचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणासंदर्भात 13 सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस पथकाने तात्काळ संशयीत आरोपीस ताब्यात घेतले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 15, 2024 | 01:30 PM
नंदुरबारमधील अल्पवयीन मुलीवर अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना घेतलं ताब्यात, वाचा संपूर्ण प्रकरण
Follow Us
Close
Follow Us:

नंदुरबार : 10 सप्टेंबर रोजी तळोदा येथील 13 वर्षीय अल्पवयीन बालिकाचे अपहरण करून तिचा खून झाल्याची घटना घडली. घटना संवेदनशील असल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीला अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे. सदर पीडित मुलगी तिचे भावासोबत शाळेत जाते असे सांगून घरातून निघुन गेली. दुपारी शाळा सुटल्यावर मुलगा हा एकटाच घरी आला पालकांनी बहिणीबद्दल विचारपूस केली असता मुलाने सांगितले की, ती एक लाल रंगाच्या मोटार सायकलवर बसून कुठे तरी निघुन गेली आहे. त्यावरुन पालकांनी तिचे शाळेत आणि आजु-बाजुच्या परीसरात तिचा शोध घेतला असता अल्पवयीन बालिका मिळून आली नाही. त्यावरुन तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता. 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडलेले असल्याची माहिती तळोदा पोलीसांना मिळाली. तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राजु लोखंडे आणि पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी पोहाचले. त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतली आणि वरीष्ठांना घटनेबाबत माहिती दिली. सदर घटना अतिशय गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोनि श्री. हेमंत पाटील आणि इतर पोलीस अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तळोदा, नंदुरबार शहर, अक्कलकुवा आणि शहादा पोलीस ठाणे सह स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना तात्काळ तपासकामी रवाना केले. 13 सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस पथकाने तात्काळ संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत सविस्तर माहिती दिली. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक. आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी. दर्शन दुगड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक , किरणकुमार खेडकर, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  गुलाबराव पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक. राजु लोखंडे, याच्या पथकाने केली आहे.

Web Title: The accused who kidnapped and killed a minor girl in nandurbar were taken into custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…
1

धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद
2

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…
3

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
4

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.