
Thieves on the prowl in Trimurti Nagar, Ravindra Chavan’s constituency
मंगळवारी रात्री भाजप कार्यकर्ते मिलिंद कांबळे हे लग्नसमारंभासाठी आपल्या मूळ गावी नांदेड येथे गेले असताना त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. घरातील एकही मौल्यवान वस्तू शिल्लक ठेवली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणखी भीती निर्माण झाली आहे.
लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद
त्रिमूर्तीनगर परिसरात चोरीच्या घटनांबरोबरच नशेखोरांचा उपद्रवही वाढल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो
परिसरात पोलिसांची नियमित आणि प्रभावी गस्त वाढवावी, तसेच चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. नशेखोरांवरही कारवाई करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजप कार्यकर्ते कपिल देव शर्मा यांनीही या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. वारंवार चोरीच्या घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Ans: परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून, नशेखोरांचा उपद्रवही वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
Ans: त्रिमूर्तीनगरमधील मिलिंद कांबळे हे नांदेड येथे लग्नसमारंभासाठी गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली. दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे.
Ans: परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, चोरट्यांचा आणि नशेखोरांचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.