Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

१८ नोव्हेंबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी, पुण्यातील सिंहगड संस्थांची सीबीआय व ईडी चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, आयपीएल २०२७ साठी महेंद्रसिंग धोनीची सीएसकेच्या मेंटरपदी निवड आणि राज्यातील हवामान व स्थानिक घडामोडी; वाचा सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठि

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2026 | 09:25 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 18.11.2026

Maharashtra Breaking News Today 18.11.2026

Follow Us
Follow Us:
  • 18 Nov 2026 09:45 AM (IST)

    18 Nov 2026 09:45 AM (IST)

    CSK IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सकडून ११ खेळाडू रिलीज 

    चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामासाठी आपल्या कायम ठेवलेल्या (Retain) आणि मुक्त केलेल्या (Release) खेळाडूंची अधिकृत यादी सोशल मीडियावर जाहीर केली आहे. नव्या हंगामापूर्वी फ्रँचायझीने संघात मोठे बदल करत तब्बल ११ खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे.

    या निमित्ताने चेन्नईचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट झाले असून, आता तो संघाचा मार्गदर्शक (मेंटर) म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार आहे. आगामी आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावासाठी चेन्नईच्या पर्समध्ये २८.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

  • 18 Nov 2026 09:35 AM (IST)

    18 Nov 2026 09:35 AM (IST)

    Alibag Traffic Tragedy: अलिबागमध्ये रस्त्याच्या कामामुळे लागलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली 

    अलिबागमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे होणारी भीषण वाहतूक कोंडी आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. बेलकडे ते अलिबाग दरम्यान लागलेल्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका तब्बल दीड ते दोन तास अडकून पडल्याने, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे २० महिन्यांच्या आरांश ठाकूर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    आरांशने चुकून फुगा गिळल्याने त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी नेले जात असताना वाटेतच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली. वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने त्याचा प्राण गेला. या हृदयद्रावक घटनेमुळे बामणगाव परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या ढिसाळ वाहतूक नियोजनावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • 18 Nov 2026 09:26 AM (IST)

    18 Nov 2026 09:26 AM (IST)

    Kandiwali Video: कांदिवली स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा AI बनावट व्हिडीओ व्हायरल 

    मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 रायफल घेऊन एक पाकिस्तानी दहशतवादी फिरत असल्याचा दावा करणारा पाच सेकंदांचा बनावट (AI Generated) व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

    हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट आणि अफवा पसरवणारा असल्याचे समोर आल्यानंतर, याप्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत अधिकृत FIR दाखल करण्यात आला आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • 18 Nov 2026 09:25 AM (IST)

    18 Nov 2026 09:25 AM (IST)

    KDMC Water Shortage: उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा!

    उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवलीकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत – सलग २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी १६ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत सूचना जारी केली आहे.

Maharashtra to World Breaking News : 

पुण्यातील ४४ सिंहगड शैक्षणिक संस्थांच्या ४०० कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) चौकशीचे आदेश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात प्रस्तावित १,५०० मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

राज्यात थंडीच्या लाटेत चढ-उतार सुरू असून आज अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा आणि २१ नोव्हेंबरपासून विदर्भात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात दोन ते तीन घरांना लागलेल्या भीषण आगीत एक व्यक्ती जखमी झाली, तर दुसरीकडे कांदिवलीत १५ वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील २७ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 18 november 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Sports News

संबंधित बातम्या

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद
1

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद

मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
2

मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय
3

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक
4

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.