Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीतील 15 कोटींच्या ॲल्युमिनियमवर डल्ला; स्टोअर ऑफिसरसह 10 जणांवर गुन्हा दाखल

वासुली येथील ॲडव्हिक ग्रुप ऑफ कंपनीजच्या ॲडव्हिक हायटेक प्रा. लि. आणि ॲडव्हिक ऑटो कॉम्प प्रा. लि. या कंपन्यांच्या विविध प्लांटमधील स्टोअरमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य ठेवण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2026 | 01:20 PM
कंपनीतील 15 कोटींच्या ॲल्युमिनियमवर डल्ला; स्टोअर ऑफिसरसह 10 जणांवर गुन्हा दाखल

कंपनीतील 15 कोटींच्या ॲल्युमिनियमवर डल्ला; स्टोअर ऑफिसरसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • औद्योगिक परिसरातील कंपनीत १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांच्या ॲल्युमिनियम साहित्याचा अपहार.
  • उत्पादनासाठीचे ॲल्युमिनियम, भंगार आणि पुनर्निर्मितीसाठी ठेवलेले साहित्य कंपनीबाहेर काढून विकल्याचा आरोप.
  • कंपनीतील स्टोअर ऑफिसरसह १० जणांवर गुन्हा दाखल.
पिंपरी : कंपनीतील उत्पादनासाठी आवश्यक असलेले ॲल्युमिनियम साहित्य, भंगार आणि पुनर्निर्मितीसाठी ठेवलेल्या साहित्याचा संगनमताने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांचे साहित्य कंपनीबाहेर काढून भंगार व्यावसायिकांना विकल्याचा आरोप आहे. हा प्रकार ३ डिसेंबर २०१८ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत खेड तालुक्यातील वासुली येथील औद्योगिक परिसरात घडला.

योगेश मकवाना (रा. संत तुकारामनगर, भोसरी), लहानू पुणेकर, दीपक कोळेकर (रा. पाईट), प्रमोद दत्तात्रय होले (रा. होलेवाडी), दीपेश तिवारी, अजय पाटोळे, विठ्ठल साळुंखे, जलालुद्दीन मोहम्मद, प्रदीप पटवा आणि वसीम शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. नितीन आनंदा सावंत (३९, रा. शिरोली, ता. खेड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि.१६) उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुली येथील ॲडव्हिक ग्रुप ऑफ कंपनीजच्या ॲडव्हिक हायटेक प्रा. लि. आणि ॲडव्हिक ऑटो कॉम्प प्रा. लि. या कंपन्यांच्या विविध प्लांटमधील स्टोअरमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य ठेवण्यात आले होते. उत्पादनासाठी आवश्यक असलेले चांगले साहित्य, भंगार तसेच पुनर्निर्मितीसाठीचे साहित्य यांचा त्यात समावेश होता. कंपनीत स्टोअर ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले योगेश मकवाना आणि लहानू पुणेकर यांनी त्यांच्या मदतीला असलेले कंत्राटी कामगार दीपक कोळेकर व प्रमोद होले तसेच कंपनीच्या व्हेंडर संस्थेचे प्रतिनिधी दीपेश तिवारी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप आहे.

ॲल्युमिनियम साहित्याचा अपहार

कंपनीने विश्वासाने ताब्यात दिलेले ॲल्युमिनियम साहित्य त्यांनी अपहार केला. या प्रकारामुळे कंपनीचे १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

वाहतूकदारांच्या मदतीने साहित्य बाहेर

कंपनीतील साहित्य पुनर्निर्मितीसाठी वाहतूक वाहनांमधून पाठविले जात होते. त्याच प्रक्रियेत वाहतूकदार अजय पाटोळे आणि विठ्ठल साळुंखे यांच्या मदतीने साहित्य वाहनांमध्ये भरून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे.

FAQ

१. कंपनीतील किती रुपयांच्या साहित्याचा अपहार झाला?
कंपनीतील तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांच्या साहित्याचा अपहार केल्याचा आरोप आहे.

२. कोणत्या साहित्याचा अपहार करण्यात आला?
उत्पादनासाठी आवश्यक ॲल्युमिनियम साहित्य, भंगार आणि पुनर्निर्मितीसाठी ठेवलेल्या साहित्याचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

३. या प्रकरणात किती जणांवर गुन्हा दाखल झाला?
स्टोअर ऑफिसरसह एकूण १० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Aluminum worth 15 crore stolen from company nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Chandrapur Crime News: चंद्रपुरच्या भर चौकात कापलेले मुंडके, तर रेल्वे पुलाखाली सापडले धड
1

Chandrapur Crime News: चंद्रपुरच्या भर चौकात कापलेले मुंडके, तर रेल्वे पुलाखाली सापडले धड

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
3

मार्केटयार्ड परिसरात रिक्षेतून एमडी विक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक
4

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागताच पळाला; दीड महिन्यांनी फरार हवालदाराला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.