Crime News: लग्न ठरल्यानंतर नवरीनेच दिली होणाऱ्या नवऱ्याची सुपारी; कारण ऐकून पोलीसही हादरले
यवत: यवतमध्ये होणारा भावी नवरा पसंद नसल्याने त्याच्याशी लग्न होऊ नये व त्याचा काटा काढावा ,या हेतूने पत्नीने भावी नवरा जीवे मारण्यासाठी दिड लाख रुपये सुपारी दिल्याची घटना घडली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आले असून सुपारी देणारी नवरी मात्र फरार झाली आहे. या मध्ये खुनाची सुपारी घेणारे आदित्य शंकर दांडगे (वय १९ , रा. गुगल वडगाव,ता.श्रीगोंदा),संदीप दादा गावडे,(वय ४० , रा. गुगल वडगाव, ता. श्रीगोंदा), मयुरी सुनिल दांडगे(रा .गुगल वडगाव, श्रीगोंदा ), शिवाजी रामदास झरे(वय ३२, पिंपळगाव पिसाळ,श्रीगोंदा), इंद्रभान सखाराम कोळपे (वय. ३७ , पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा) ,सुरज शंकर जाधव(वय ३६) यांना अटक करण्यात आली असून नवरीबाय मयुरी सुनील दांडगे ही फरार झाली आहे.
याबाबतची फिर्याद सागर जयसिंग कदम( वय २८ रा. माही जळगाव, ता . कर्जत, जि. अहिल्यानगर)याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, मयुरी दांडगे व सागर कदम यांचे लग्न ठरले होते. परंतु मुलीला सागर कदम पसंद नव्हता, या आकसाने सागरला जीवे मारण्याची सुपारी आदित्य शंकर दांडगे यास देण्यात आली. आदित्य याने साथीदार जमवुन त्यांना कार मधून येवून खामगाव हद्दीतील खामगाव फाटा सोलापूर रोडवरील हाँटेल साई मिसळ समोर सागरला अडवले . तू मयुरीशी लग्न करतोस काय? असे म्हणत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सायं ७:५० दरम्यान घडली. याबाबत दि.१ मार्च रोजी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास कामी दि. २८ मार्च रोजी संशयीत शंकर दांडगे याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा मयुरी सुनील दांगडे, संदिप दादा गावडे यांच्या सांगण्यावरून मुलीचा होणारा नवरा सागर कदम हा पसंद नाही. त्यास जीवे मारण्यासाठी दिड लाख रुपये सुपारी घेवून मी व शिवाजी रामदास झरे, इंद्रभान सखाराम कोळपे, आणि सुरज दिगंबर जाधव मिळून सागर कदम यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली,अशी कबूली दिली.
पोलीसांनी चाकी गाडी, आणि लाकडी दांडके जप्त केले आहे. या तपास कामी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शनखाली यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमूख, सहा.पो.नि.महेश माने, सलिम शेख, प्रविण सपा़गे, किशोर वांगज , मारोती मेतलवाड, करचे, चांदणे, बारहाते, देवकर, काळे, गरुड, यादव कापरे आणखी भानवसे यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास महेश माने हे करीत आहेत.