टोप मध्ये लहान मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न घटनेने परिसरात खळबळ
कुर्डवाडी : पडसाळी (ता. माढा) येथील शेतकऱ्याला बळजबरीने गाडीवर बसून अपहरण करीत ३ लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर मोहन फरड (रा. पडसाळी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी रवी भोसले, अक्षय पवार, कृष्णा शिंदे, सतीश भोसले, दीपाली शिंदे, अविधा भोसले (सर्व रा. बारलोणी, ता. माढा) यांच्यासह इतर दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भुताष्टे पाटीजवळ लऊळ शिवारातील हॉटेल यशराजमध्ये फिर्यादी ज्ञानेश्वर फरड व पुतण्या समाधान फरड जेवणासाठी गेले होते. यावेळी जेवणाची ऑर्डर देऊन जेवण चालू असताना हॉटेलवर संशयित आले. त्यानी फिर्यादीच्या पुतण्याला बाहेर बोलावून घेऊन गेले. काय घडले याची पाहणी करण्यासाठी फिर्यादीही त्यांच्या मागे गेले. नंबर नसलेल्या दोन दुचाकींपैकी एका गाडीवर बळजबरीने बसवून समाधानला कुडूवाडीला घेऊन जाताना फिर्यादीला यामध्ये तुम्ही पडू नका, असाही दम दिला. त्यानंतर फिर्यादीने दुसरा पुतण्या सिद्धेश्वर फरड याला फोन करून घटना सांगितली. त्यानुसार त्याने फिर्यादीतील व्यक्तींची ओळख सांगू शकतो, असे सांगितले. दरम्यान समाधान वेळोवेळी सिद्धेश्वरला ३ लाख रुपये फोनवर मागत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सरपंचाचे अपहरण करुन खून
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. यावरुन आता राज्यात वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले.
आता शेतकरीही नाही सुरक्षित! माढ्यात अपहरण करुन खंडणीची मागणी
याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणावरुन आता देशमुख यांच्या कुटुंबीयांची अनेक नेते घरी जाऊन भेट देत आहेत.