crime (फोटो सौजन्य: social media )
कानपूरच्या सचेंडी क्षेत्रात एक धक्कदायक घटना सामोर आली आहे. १० महिन्यापूर्वी भाच्याच्या प्रेमात पडलेल्या मामीने भाच्यासोबत मिळून भयंकर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. तिने १० महिन्यापूर्वी भाच्याच्या प्रेमात पडलेल्या मामीने पतीची निर्घृण पद्धतीने हत्या केले. त्यानंतर नवऱ्याचं अस्तित्व संपवण्यासाठी तिने घराजवळ एक खड्डा खोदला, त्यात तिने नवऱ्याला दफन केलं. एवढंच नाही तर कुठलाही पुरावा राहू नये म्हणून मृतदेहा गळवण्यासाठी १० ते 12 किलो मीठही खड्डायात टाकलं.
Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार
काही दिवसांनी कुत्र्यांना मृतदेहाचा वास आला. कुत्र्यांनी तिथे खड्डा खोदल्यानंतर त्यात मानवी हाडं मिळाली. त्यानंतर आरोपी पत्नी आणि भाच्याने ती हाड उचलून कालव्यात प्रवाहीत देखील केली. ही घटना कानपूरच्या सचेंडी पोलीस ठाणे क्षेत्र लालपूर गावातील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव शिववीर असे आहे. तर आरोपीचे नाव लक्ष्मी असे आहे.
कसा आला प्रकरण समोर
दहा महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. सूनबाईच लक्ष्मी हिने मृतकाच्या आईला सांगितलेलं की, शिववीरला कोणाचा तरी फोन आलेला. त्यानंतर नोकरीसाठी म्हणून तो गुजरातला निघून गेला. आई सावित्री अनेक महिने लक्ष्मीला शिववीर बद्दल विचारत होती. पण प्रत्येकवेळी ती वेगवेगळी कारणं देत होती. त्यामुळे तिचा संशय बळावला. तिने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार 19 ऑगस्ट रोजी सचेंडी पोलीस ठाण्यात नोंदवली.
ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा
मुलाचा शोध घेण्यासाठी सावित्री यांनी पोलिसांकडे विनंती केली. सावित्राने नाती आणि सूनेवर संशय व्यक्त केला. या संपूर्ण घटनेची माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर यांनी सांगितलं की, भाचा अमित आणि शिववीरची बायको लक्ष्मी यांच्यात अफेअर होतं. ग्रामस्थांमध्ये याची दबक्या आवाजात चर्चा होती. आईच्या आरोपानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या कटाचा उलगडा झाला.
पती ठरत होता अडथळा
अनैतिक संबंधात मामा अडथळा ठरत होता. म्हणून मामी आणि भाच्याने मिळून ही निर्घुण हत्या केली. मामा रात्री झोपेत असतांना भाच्याने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करुन मामाची हत्या केली. त्यानंतर घराच्या मागे खड्ड खणून त्यात मृतदेह दफन केला. एवढंच नाही तर कुठलाही पुरावा राहू नये म्हणून मृतदेहा गळवण्यासाठी १० ते 12 किलो मीठही खड्डायात टाकलं. काही दिवसांनी कुत्र्यांना मृतदेहाचा वास आला. कुत्र्यांनी तिथे खड्डा खोदल्यानंतर त्यात मानवी हाडं मिळाली. त्यानंतर आरोपी पत्नी आणि भाच्याने ती हाड उचलून कालव्यात प्रवाहीत देखील केली. पोलिसांनी भाचा आणि मामीला अटक केली आहे.
Pune Gramin Police : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता