Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धडक 'स्ट्राइक'! ५४ ठिकाणी तपासणी अन् ४ आस्थापनांचे परवाने निलंबित... दुसरीकडे दुष्काळाचा वारीच्या गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 01:27 PM
FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! 'या' चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! 'या' चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

Follow Us
Follow Us:
  • पंढरपुरात कार्तिकी वारीपूर्वी एफडीएने केले ४ आस्थापनांचे परवाने निलंबित
  • प्रसादाचे २० नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून २० विशेष पथके तैनात
  • दुष्काळामुळे वारीच्या गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता 
FDA Action: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पंढरपुरात मोठी धडक कारवाई केली आहे. या तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्या चार मोठ्या आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. एकादशीच्या ऐन ४८ तास आधी एफडीएने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Student Suicide: लग्नासाठी तगादा अन् ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या…

५४ ठिकाणी तपासणी; २० नमुने प्रयोगशाळेत

एफडीएच्या पथकाने काल दिवसभर पंढरपुरातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्रेते अशा एकूण ५४ आस्थापनांची कसून पाहणी केली. या तपासणीदरम्यान उपवासाचे व प्रसादाचे पदार्थ असलेल्या भगर, बटाटा चिवडा, राजगिरा लाडू आणि इतर प्रसादाचे सुमारे २० नमुने अन्न विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…

चार आस्थापनांचे परवाने निलंबित

तपासणीदरम्यान अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. यामध्ये पॉप्युलर रेस्टॉरंट, श्री महावीर वेज, बेंगलोर अय्यंगार बेकरी आणि स्वागत एंटरप्राइजेस या चार आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. वारीच्या काळात भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

एफडीएची २० विशेष पथके तैनात वारीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. त्यांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी शहरात एफडीएची २० विशेष पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली आहे.

दुष्काळाचा वारीच्या गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता

दरम्यान, कार्तिकी एकादशीचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली वारीच्या नियोजनाची अंतिम बैठक पार पडली. यावेळी बोलताना गोरे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या गर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. शेतकरी आणि वारकऱ्यांना घराबाहेर पडताना जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान समोर असल्याने यंदा भाविकांच्या संख्येत घट होऊ शकते, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंढरपुरात एफडीएने कोणत्या चार आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत?

    Ans: गुणवत्ता व स्वच्छतेच्या त्रुटींमुळे पॉप्युलर रेस्टॉरंट, श्री महावीर वेज, बेंगलोर अय्यंगार बेकरी आणि स्वागत एंटरप्राइजेस या चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

  • Que: एफडीएने किती ठिकाणी तपासणी केली आणि कोणते नमुने पाठवले?

    Ans: एफडीएने ५४ आस्थापनांची तपासणी केली असून भगर, बटाटा चिवडा, राजगिरा लाडू आणि प्रसादाचे सुमारे २० नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच २० विशेष पथके तैनात केली आहेत.

  • Que: कार्तिकी वारीच्या गर्दीबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काय म्हटले आहे?

    Ans: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान असल्याने यंदा वारीच्या गर्दीवर परिणाम होऊन भाविकांच्या संख्येत घट होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Pandharpur kartiki ekadashi fda action license suspended jaykumar gore sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • FDA Action
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित
1

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित

Pandharpur Kartiki Wari 2026: कार्तिकी वारी २०२६ साठी पंढरीनगरी सज्ज!; ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी २४ तास दर्शन व्यवस्था
2

Pandharpur Kartiki Wari 2026: कार्तिकी वारी २०२६ साठी पंढरीनगरी सज्ज!; ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी २४ तास दर्शन व्यवस्था

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…
3

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी ड्रेसकोड; मंदिर प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत
4

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी ड्रेसकोड; मंदिर प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.