Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका

वाळूज एमआयडीसीतील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (सी/ओ गुडईयर साऊथ एशिया टायर्स प्रायव्हेट लिमिटेड) च्या कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तात्काळ निलंबित केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2026 | 12:52 PM
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या तपासणीत १०६ पैकी केवळ ४४ गुण मिळाल्याने वाळूज एमआयडीसीतील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (सी/ओ गुडईयर साऊथ एशिया टायर्स प्रायव्हेट लिमिटेड) च्या कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तात्काळ निलंबित केला आहे. कॅन्टीनमधील अनियमिततेबाबत आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या तक्रारीनंतर ३० सप्टेंबर रोजी झालेल्या अचानक तपासणीत हा प्रकार समोर आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी कॅन्टीनची तपासणी केली. १०६ गुणांच्या निकषांमध्ये कॅन्टीनला अवघे ४४ गुण मिळाले. त्यामुळे अंतिम निष्कर्ष नॉन-कम्प्लायन्स असा नोंदविण्यात आला.

 

४४ गुणांत काय दिसले ? 

तपासणीदरम्यान अन्न साठवण्यासाठी वापरला जाणारा फ्रिज गंजलेला आणि दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला. कच्चे व शिजवलेले तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्न एकत्र ठेवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा : उजनीतील एआय कॅम्पस, डेटा सेंटर व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या पाणीवापराची माहिती द्या; खासदार मोहिते पाटलांची मागणी

तक्रार अन् सरप्राइज तपासणी

आमदार प्रशांत बंब यांनी सोडेक्सो कॅन्टीनमधील अनियमिततेबाबत तपासणी करण्याची मागणी करणारे पत्र अन्न प्रशासनाला दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा विभागाने कॅन्टीनची अचानक तपासणी केली. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला.

निलंबनाच्या काळात कॅन्टीनमधील अन्न तयार करणे, प्रक्रिया, विक्री, वितरण आणि भोजन पुरवठ्यासह सर्व कॅटरिंग व्यवसायिक क्रिया बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करून अनुपालन अहवाल पुराव्यांसह प्रशासनाकडे सादर केल्यानंतर फेरतपासणी केली जाणार आहे. त्रुटींची पूर्तता समाधानकारक झाल्यानंतरच परवाना पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. -श्रीकांत करकळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

Web Title: The food and drug administration has suspended the license of the goodyear canteen nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द
1

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
2

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.