मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येबाबत दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत, काही दिवसांपूर्वी बाबा सिद्धीकी यांची हत्या बिष्णोई गॅंगने केलीच नाही, अशी माहिती समोर आली होती, पण आता बाबा सिद्धीकी यांची हत्या बिष्णोई गॅंगनेच घडवून आणल्याचा पुरावा हाती लागला आहे. लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईचा बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे हात असल्याचे समोर आले आहे. अनमोल बिष्णोई हा आरोपींच्या थेट संपर्कात असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
अनमोल बिष्णोई आरोपींशी मेसेंजर च्या माध्यमातून संपर्कात होता.या प्रकरणी त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी सुजित सिंहला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. हा सुजित सिंह अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर अनमोल बिष्णोईलाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी अनमोलच्या इशाऱ्यावरून अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता.
हेही वाचा:महाविकास आघाडीत पेच निर्माण; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बंडखाेरीच्या तयारीत
सुजीत सिंह च्या सांगण्यावरून अटक करण्यात आलेल्या नितीन सप्रे आणि राम कानोजिया यांची बाबा सिद्धीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 32 वर्षीय सुजीत सिंहला पंजाबमधून अटक केली.
सिंह याच्या सांगण्यावरून या प्रकरणात अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली आहे. सुजीत सिंह परदेशातील काही गुंडांशी संपर्कात होता.
हेही वाचा: संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरणाला वेगळे वळण; जयश्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल