Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदु बाबाला अटक; म्हसवड पोलीसांची मोठी कारवाई

भोंदु बाबा मंगेश गौतम भागवत याला म्हसवड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर त्याला मदत करणारा त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे हा अद्यापही फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2025 | 12:30 AM
पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदु बाबाला अटक; म्हसवड पोलीसांची मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

म्हसवड : म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील देवापूर येथील कांता बनसोडे यांना जादुटोणा करुन पैशाचा पाऊस पाडुन रक्कम १० पट करुन देण्याचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या भोंदु बाबा मंगेश गौतम भागवत (वय वर्ष ३२ रा. कळस, ता. इंदापूर) याला म्हसवड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर त्याला मदत करणारा त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे हा अद्यापही फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत म्हसवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता वामन बनसोडे हे आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त झाल्याची माहिती म्हसवड येथील सर्जेराव वाघमारे यांना समजताच त्यांच्याकडे सेवानिवृत्तीचा आलेला पैसा पाहून ते पैसे जादुटोणा करुन आणखी १० पट करुन देण्याचे आमिष दाखवत त्यांना वाघमारे यांनी त्यांना भोंदु बाबाच्या घरी नेले. त्याठिकाणी गेल्यावर भोंदु बाबा मंगेश भागवत याने त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून गोल रिंगणात बसवले व मंत्रोच्चार करीत त्यांच्या हातात एक बॉक्स देत हा बॉक्स २१ दिवसांनी घरी जावून हळदी कुंकू लावुन उघडण्यास सांगितले, त्यापुर्वी कांता बनसोडे यांच्याकडून या भोंदुबाबाने ३६ लाख रुपये घेतले तर हातात दिलेल्या बॉक्समधील रक्कम ही १० पट म्हणजे ३६ कोटी रुपये होतील असे सांगितले.

दरम्यान त्यानंतर कांता बनसोडे हे तो बॉक्स घेऊन घरी आले व तो बॉक्स त्यांनी घरातील देव्हार्यावर ठेवला, २१ दिवसानंतर त्यांनी तो बॉक्स उघडला असता त्यामध्ये पेपर कात्रण केलेली रद्दी आढळल्याने त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे भोंदु बाबाचे सहकारी सर्जेराव वाघमारेला सांगितले. त्यावेळी तुमचे ग्रहमान ठिक नाही, पुन्हा मंत्रोपच्चार करुन देतो असे मंगेश भागवत याने सांगितल्यावर कांता बनसोडे यांनी त्याला नकार देत आपले पैसे परत मागितले त्यावर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यावर कांता बनसोडे यांनी दिनांक ४ जानेवारी रोजी अखेर भोंदु बाबा व त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे या दोघांविरोधात म्हसवड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

ही तक्रार दाखल होताच गुन्हाची गंभीरता पाहुन सहाय्यक पोलीस निरिक्षक सखाराम बिराजदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना याबाबतची माहिती दिली. शेंडगे यांनीही तात्काळ म्हसवड येथे जाऊन देवापुर येथील कांता बनसोडे यांच्या घरी भेट देत तपासाच्या योग्य त्या सुचना बिराजदार यांना दिल्या. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत भोंदु बाबा मंगेश गौतम भागवतला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. अद्यापही त्याचा साथीदार असलेला सर्जेराव वाघमारे हा फरार असून त्याचाही म्हसवड पोलीस शोध घेत आहेत. ‌‌

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले

दरम्यान पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदु बाबा मंगेश भागवतने माण तालुक्यातील अनेक जणांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तवली जात असून या पैशाची चटक किती जणांना लागली होती, किती जण या पैशाच्या पाऊसात भिजले आहेत, याचाही शोध म्हसवड पोलीस घेत आहेत. तर याप्रकरणी फरार असलेल्या वाघमारेने आणखी किती जणांशी पैशाचा पाऊस पाडण्याचा करार केला होता याचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी अटक केलेला मुख्य आरोपी मंगेश भागवतला म्हसवड न्यायालयात पोलीसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यास २१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The police have arrested bhondu baba who rained money nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • Satara Police

संबंधित बातम्या

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
1

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.