Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एअरो स्पेस मॉलमधील ‘द हाऊस कम्यून बार अँड ईटरी’ बारमध्ये गुन्हे शाखेने छापा कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 11:38 AM
बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले

बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले

Follow Us
Follow Us:
  • बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई
  • आठ जणांवर गुन्हा दाखल
  • तब्बल 89 ग्राहक आढळले
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एअरो स्पेस मॉलमधील ‘द हाऊस कम्यून बार अँड ईटरी’ बारमध्ये गुन्हे शाखेने छापा कारवाई केली आहे. रविवारी पहाटेपर्यंत नियमबाह्य पद्धतीने दारू पुरवठा सुरू असल्याचे आढळून आले असून, याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या वेळी बारमध्ये महिलांसह ८९ ग्राहक उपस्थित होते.

याप्रकरणी सुमित गोटे (स्पॉन्सर), नूर हुसून शेख (मॅनेजर), सोनाली पंडित (डीजे), मंगेश धिमधिमे (मालक), अनिकेत किर, सुनीता वर्मा, अनंत गायकवाड आणि शानूर काजी (कामगार) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर बीएनएस कलम २२३, ३(५), दारूबंदी कायद्यातील कलम ६८, ७७, ८२, ८३, तसेच प्रो. ऑफ. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर अॅक्ट कलम ४ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३३(डब्ल्यू) सह नियम १३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पब तसेच हॉटेल्स आणि बारला नियम पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे. दीडपर्यंत बार सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हॉटेल्स सुरू ठेवले जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी हाऊस पार्टीचा पर्दाफाश केला होता. दरम्यान, रविवारी (९ ऑगस्ट) पहाटे सुमारे साडे तीनच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने एअरो स्पेस मॉलमधील बारमध्ये उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार, पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी नियमबाह्य पद्धतीने आस्थापना सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. छाप्यात पोलिसांनी १ लाख ६७ हजार रुपये किमतीची मद्यसाठा आणि सुमारे ७५ हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम, असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे सुद्धा वाचा : बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

ग्राहक : ८९

पुरुष : ६३

महिला : २६

जप्त मुद्देमाल

मद्यसाठा : १.६७ लाख

साऊंड सिस्टीम : ७५ हजार

एकूण : २.४२ लाख

हे सुद्धा वाचा : भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

Web Title: The police raided a bar and registered a case against eight people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
4

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.