Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

कान्हे (ता. मावळ) येथील मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत हॉटेल परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 03:00 PM
कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : कान्हे (ता. मावळ) येथील मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत हॉटेल परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १०५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ, अंदाजे २ हजार १०० रुपये किमतीचा, जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहमोहम्मद अमुरद्दीन शेख कुरेशी (वय ५५, रा. कान्हे गावठाण, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कान्हे गावच्या हद्दीत मुंबई ते पुणे जाणाऱ्या जुन्या महामार्गावर हॉटेल आस्वादच्या शेजारील हॉटेल पवार बिर्याणी परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी संशयित व्यक्तीच्या ताब्यात अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ४८ ग्रॅम वजनाचा, ९६० रुपये किमतीचा गांजा सदृश्य अमली पदार्थ, तर दुसऱ्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५७ ग्रॅम वजनाचा, १ हजार १४० रुपये किमतीचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. दोन्ही पिशव्यांमधील पदार्थाचे एकूण वजन १०५ ग्रॅम असून त्याची एकूण किंमत २ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार संपत चहादु वायळ (ब.नं. १५८१) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५९/२०२६ नुसार गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची वेळ १८ ऑगस्ट रोजी रात्री ११.०९ वाजता असून स्टे.डा. नोंद क्रमांक ५५/२०२६ आहे.

गुन्ह्याचा प्रथमवर्दी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ यांच्या न्यायालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ करीत आहेत. तपासकामी पोलीस हवालदार मुंढे (ब.नं. २४२६) यांचे सहकार्य आहे. या कारवाईमुळे कान्हे परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले असून, जप्त केलेला पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: The vadgaon maval police have registered a case against a person for possessing cannabis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Drugs News

संबंधित बातम्या

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या
1

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
2

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

दिंडोरीत खळबळ! पैशांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
3

दिंडोरीत खळबळ! पैशांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून; सीसीटीव्हीमुळे उघड झाला आरोपीचा बनाव
4

प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून; सीसीटीव्हीमुळे उघड झाला आरोपीचा बनाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.