Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा प्रवाशांना मनस्ताप; एसटी स्थानकांमध्ये तब्बल लाखोंचा माल गेला चोरीला

छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2024 | 02:35 AM
दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा प्रवाशांना मनस्ताप; एसटी स्थानकांमध्ये तब्बल लाखोंचा माल गेला चोरीला

दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा प्रवाशांना मनस्ताप; एसटी स्थानकांमध्ये तब्बल लाखोंचा माल गेला चोरीला

Follow Us
Follow Us:

पुणे: एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेली, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत. ते गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील फलाट क्रमांक नऊ परिसरात थांबले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. सोनसाखळी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात राहायला आहेत. त्या दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड, मोबाइल संच असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला. पोलीस हवालदार बोरकर तपास करत आहेत.

हेही वाचा: Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क

दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील एसटी स्थानकाच्या आवारातून प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढतात.
दिवाळीत एसटी स्थानकांच्या परिसरात गर्दी असते. शहरात वास्तव्यास असणारे विद्यार्थी, नोकरदार गावी जातात. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात ऐवज चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागतात. एसटी स्थानकाच्या आवारात पोलिसांचा वावर नसतो. एसटी स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याच्या तक्रार करण्यात आली आहे.

Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क

ऐन  दिवाळीत शहरात गोळीबाराची घटना घडली. येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एका टेम्पोचालकावर बंदुकीतून गोळीबार केला. गोळीबारात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा येरवड्यातील अशोकनगर परिसरात ही घडली घडली. शहानवाज शेख असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त लष्करी जवान श्रीकांत पाटील याला येरवडा पोलिसांनी अटक केली. येरवडा भागातील अशोकनगर परिसरात पाटील आणि शहानवाज यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. रागातून पाटील याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Web Title: Thefts looted big amount at msrtc bus stand in pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.