Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

केक, तसेच बेकरी माल उत्पादक नामाकिंत कंपनीची वितरण एजन्सी सुरू करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2025 | 05:57 PM
पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले
  • ३६ वर्षीय तरुणाने पोलिसांत दिली तक्रार
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी नपडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात आहे मात्र फसवणुकीच्या घटना थांबताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक घटना समोर आली आहे. केक, तसेच बेकरी माल उत्पादक नामाकिंत कंपनीची वितरण एजन्सी सुरू करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

तक्रारदार तरुण मांजरी भागात राहतो. त्याला केक विक्रीचे दुकान सुरू करायचे होते. याबाबत त्याने ऑनलाईन काही केक तसेच बेकरी उत्पादकांची माहिती घेतली. त्यावर दिलेले संपर्क घेतले व त्यांच्याशी संपर्क साधला. नंतर त्याला चोरट्यांनी संपर्क साधला. वितरण एजन्सी देण्याचे आमिष दाखविले. तरुणाला ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. त्याने खात्यात वेळोवेळी ६ लाख १५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाने सायबर चोरट्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांचा मोबाइल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यनंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक

इस्लामपुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इस्लामपूर येथील महिलेची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दापोली तालुक्यातील दांपत्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताई दत्ताराम चोगले, दत्ताराम नामदेव चोगले (रा. पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आशाराणी शिवाजी पाटील (वय ४९, रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. २३ नोव्हेंबर २०२३ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला आहे.

Web Title: There has been an incident where cyber thieves have cheated a young man in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई
1

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…
2

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…

जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा
3

जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.