Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Drug News : पुण्यनगरीत गांजाला भरमसाठ ‘डिमांड’; 5 महिन्यात तब्बल…

पुणे केवळ ५ महिन्यात शहरात तब्बल २६४ किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरवर्षी ७०० ते १००० किलो गांजा पकडला जातो.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2025 | 01:18 PM
पुण्यनगरीत गांजाला भरमसाठ 'डिमांड'; 5 महिन्यात तब्बल...

पुण्यनगरीत गांजाला भरमसाठ 'डिमांड'; 5 महिन्यात तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : आयटी हब आणि तरुणाईसोबतच कामगार वर्गाची संख्या जास्त असलेल्या पुण्यनगरीत गांजाला ‘डिमांड’ वाढल्याचे चित्र आहे. कोकेन, एमडीसह मानव निर्मित होणाऱ्या ड्रग्जविरोधात पुणे पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केल्यानंतर ही मागणी वाढल्याचे बोलले जाते. केवळ ५ महिन्यात शहरात तब्बल २६४ किलो गांजा पकडण्यात यश आले आहे. दरवर्षी ७०० ते १००० किलो गांजा पकडला जातो. त्यामुळे पकडला जात नसलेला गांजा किती असेल याचा अंदाज लावणेही पोलिसांना कठीण मानले जाते.

पुणे पोलिसांनी ड्रग्जविरूद्ध जोरदार मोहिम उघडत नाशिकला उत्पादित होणारे व पुणे व्हाया मुंबईपर्यंत जाणारा एमडी पकडला. त्यात ललित पाटील व टोळी पकडली. नंतर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत उत्पादित केले जाणारा व त्याचे भारतासह परदेशात विक्रीचे रॅकेट उघड केले. नंतर शहरात ड्रग्ज वितरीत करणारी साखळी, ड्रग्ज घेणाऱ्यांचीही यादी काढून त्यांच्याकडून पाळेमुळे खोदली. पोलिसांच्या कारवाईच्या धडाक्याने अनेक तस्कारांनी पुण्यातून काढता पाय घेतल्याचा दावा पोलिसांचा आहे. कारवाईतून देखील हेच चित्र दिसत असून, कोकेन, एमडी, ब्राऊन शुगरसह इतर अमली पदार्थांची आवक कमी झाल्याचे दिसते. मात्र, दुसरीकडे गांजा तस्करीचे प्रकरण सातत्याने पुढे येत आहेत.

गेल्या ५ महिन्यात २६४ किलो गांजा पकडला गेला आहे. पुण्यात गांजा परराज्यातून व शहरातून आणला जातो. ग्रामीण भागात गांजाची शेतीच चालवली गेल्याचेही प्रकरण समोर आलेली आहेत. गांजा गाडीवर तसेच कारमधून आणला जातो. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात गांजाचे काही डिलर आहेत. त्यांच्याकडून पुढ्यांमध्ये या गांजाची विक्री होते. ठरावीक व ओळखीतील लोकांनाच तो तिला जातो.

दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा केली. २६ जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (१९८७) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.

गरिबांचा गांजा

अमली पदार्थ घेणार्‍यांमध्ये देखील उच्च अन् उच्चभ्रु असा भेद माणला जातो. सर्वाधिक महागडा अमली पदार्थ घेणारा वर्ग उच्चभ्रु असल्याचे समोर आले. त्या खालोखाल कमी किंमत असणारे अमली पदार्थ घेतात, अशी निरीक्षण पोलिसांचे आहे. हजारो रुपयांत मिली ग्रॅममध्ये विक्री होणारे ड्रग्ज घेणारा वर्ग एक तर विद्यार्थी, मोठ्या नोकरदार असल्याचे समोर आले आहे. तर, गांजा हा कामगार वर्ग, वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर नोकरी करणारा वर्ग पित असल्याचे निरीक्षण आहे.

वर्षानुसार गांजा कारवाई

वर्ष-              दाखल गुन्हे     जप्त गांजा-                       किंमत
२०२१ –           ६०-              ४८६ किलो १९२ ग्रॅम-         १,१०,८७,८६२
२०२२-            ८९-               ७९९ किलो ३८३ ग्रॅम-         १,५४,८१,८९५
२०२३-            ५९-              १ हजार ५८ किलो ३२२ ग्रॅम- २,१२,०७,८५५
२०२४-            ७९-              ३१५ किलो ८४८ ग्रॅम-         ८७,४९,३५४
३१मे २०२५-   ४५-             २६४ किलो ७०५ ग्रॅम-          ९०,६१,१६२

अमली पदार्थांची ग्रॅममध्ये किंमत

  • कोकेन- १ ग्रॅम-  १५ ते २० हजार रुपये
  • मेफेड्रोन-१ ग्रॅम- अडीच हजार रुपये
  • चरस (तोळ्यांमध्ये विकले जाते) १० तोळे- दिड ते अडीच हजार रुपये
  • गांजा- १ किलो- १५ ते २० हजार रुपये
  • अफू- १ किलो- सव्वा ते दिड लाख (अंदाजे १ ग्रॅम दोन हजार रुपये)
  • ब्राऊन शुगर – १ग्रॅम- १ हजार रुपये

Web Title: There has been information that there has been a high demand for marijuana in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • crime news
  • Drugs News
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
2

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
3

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
4

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.