चाकण येथे खाजगी बसची एसटीला जोरदार धडक; 13 जण जखमी
पिंपरी : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता खेड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील खालूंब्रे परिसरात सोमवारी (दि. १४) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कामावर जाण्यासाठी लिफ्ट घेतलेल्या तरुणाचा हा प्रवास दुर्दैवाने अखेरचा ठरला आहे.
गजानन बाबुराव बोलकेकर (वय २६, रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आदित्य गजाननराव गायकवाड (वय २३, रा. येलवाडी, ता. खेड) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय शंकरराव तंतरपाले (वय २४, रा. चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (वय ३०, रा. धारावी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
गजानन बोलकेकर हा चाकण एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत होता. सोमवारी सकाळी पहिल्या शिफ्टसाठी कामावर जात असताना उशीर झाल्याने त्याने रस्त्यात दुचाकीस्वार आदित्य गायकवाड याच्याकडे लिफ्ट मागितली. ते दोघे हुंडाई चौकाजवळ पोहोचले असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आदित्य गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावर भीषण अपघात
पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष कराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजय जेधे हे मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. कात्रज भागातील बीआरटी मार्ग परिसरात भरधाव दुचाकी घसरली. अपघातात दुचाकीस्वार जेधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून, हवालदार भोसले अधिक तपास करत आहेत.