Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे दागिने केले लंपास

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2024 | 09:45 PM
Pune Crime News: ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला; तब्बल 'इतक्या' लाखांचे दागिने केले लंपास

Pune Crime News: ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला; तब्बल 'इतक्या' लाखांचे दागिने केले लंपास

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याबाबत सराफी पेढीच्या मालकांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांची सराफी पेढी वडगाव शेरी भागात आहे. आठवड्यापूर्वी चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. दागिने खरेदीचा बहाणा चोरट्यांनी केला. पेढीतील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. पेढीतील कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची मोजदाद करत असताना चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करत आहेत.

पुण्यात चोरट्यांनी फोडली ५ दुकाने

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या  घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुणे पोलीस कसोशीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा: शैक्षणिक पंढरीत गुन्हेगारी बोकाळली; वर्दळीच्या FC रस्त्यावर चोरट्यांनी फोडली ५ दुकाने, किती रक्कम लुटली?

सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत , प्रमुख मार्गांवर वर्दळ वाढली आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने फोडली आहेत. एका रात्रीत एकूण ५ दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे.  उपलब्ध माहितीनुसार, चोरट्यांनी लाखोंचा माल लुटला आहे. जवळपास १.२५ लाख रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अट्टल चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पुण्यात दोन गटांत हाणामारी

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता आळंदी रस्त्यावर असलेल्या कळस गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीत चौघे जखमी झाले असून, याप्रकरणी परस्परविराेधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भीष्मा चव्हाण (वय २४, रा. कळस ) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चव्हाणच्या तक्रारीनुसार रोहित लोखंडे (रा. दिघी), गगन लाड (रा. टिंगरेनगर) आणि स्वप्नील महाजन (रा. कळस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thieves stolen 4 lakhs jewellery in diwali festival vadgaon sheri pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 09:43 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना
1

Pune Crime: CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात ११ वी अटक, पुण्यातून मनीषा हवालदारला CBI च्या बेड्या
2

NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात ११ वी अटक, पुण्यातून मनीषा हवालदारला CBI च्या बेड्या

Navbharat Social Impact Summit 2026:  नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार
3

Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक
4

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.