पुण्यात एकाच रात्रीत ५ दुकाने फोडली (फोटो- istockphoto)
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुणे पोलीस कसोशीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.
सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत , प्रमुख मार्गांवर वर्दळ वाढली आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने फोडली आहेत. एका रात्रीत एकूण ५ दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, चोरट्यांनी लाखोंचा माल लुटला आहे. जवळपास १.२५ लाख रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अट्टल चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यात दोन गटांत हाणामारी
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता आळंदी रस्त्यावर असलेल्या कळस गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीत चौघे जखमी झाले असून, याप्रकरणी परस्परविराेधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भीष्मा चव्हाण (वय २४, रा. कळस ) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चव्हाणच्या तक्रारीनुसार रोहित लोखंडे (रा. दिघी), गगन लाड (रा. टिंगरेनगर) आणि स्वप्नील महाजन (रा. कळस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात गुन्हेगारी वाढली
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी चांगलीच बोकाळलीय. नशाखोरी, बड्या बेट्यांचे कारनामे, महिलांवरील अत्याचार आणि गुंडगिरीने पुणे शहरात कायद्याचं शासना राहिलंय की नाही, असा प्रश्न उद्धभला आहे. गेल्या काही महिन्याखाली पुणे शहरातील सुस येथे बिल्डरने तुफान राडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. एका बिल्डरने रहिवाशांना चक्क दंडुक्याने मारहाण केली होती. महिलांनादेखतच अश्लील शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सुस येथील लगतच्या सोसायटी धारकांसोबत सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली. पोलीस घटनास्थळी येताच प्रकरण थंडावले. नंतर बिल्डरला घेऊन पोलीस येत असताना रहिवाशांनी गाडीची डिकी तपासण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी डिकी तपासली असता लाकडी दांडके आणि बॅट्स आढळल्या. त्यावरून बिल्डर कट रचून आल्याचा आरोप तीर्थ टॉवर्सच्या रहिवाशांनानी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.