crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींवर लोखंडी पाईप व रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना चऱ्हाटा या गावात घडली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पाईप आणि रॉडने अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, ३ महिलांचा समावेश
मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव शेख रिजवाना बबनीन व शेख निलफोर, शेख हरून असे आहे. गावातल्याच चार ते पाच जणांनी संगनमत करून मारहाण केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र संपूर्ण प्रकार पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला अधिक सक्रिय राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलेसोबत बळजबरी; दागिन्यांसह रोकडही लुटली
एक तासाच्या कामाचे 500 रुपये देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने महिलेसोबत बळजबरी केली. मुलापासून दडवून ठेवलेले दागिनेही घेऊन फरार झाला. या प्रकरणात आरोपीसंबधी कुठलाच ठाव ठिकाणा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला शोधून काढले. रजनीशकुमार दुबे (वय ५०, रा. कळमना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा रिवा (मध्यप्रदेश) येथील असून, गेल्या ५ वर्षांपासून नागपुरात राहतो. तो आचारीचे काम क
पीडित महिला ५० वर्षांची असून, ती साफसफाई, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करते. तिला एक मुलगा आहे. मुलगा दारूच्या आहारी गेला असून व्यसनासाठी तो घरातील साहित्यांची विक्री करतो. त्याच्या भीतीने पीडित महिला दागिनेही सोबत ठेवायची. घटनेच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी ती कामावरून घरी जात असताना आरोपी रजनिश तिला रस्त्यात भेटला. मी महाराज आहे. भांडी धुण्याचे तासाभऱ्याचे काम आहे. यासाठी पाचशे रुपये देईन, असे आमिष दिले.
पीडिता त्याच्या आमिषाला बळी पडली. दुचाकीवर बसवून तिला प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत निर्जन अपार्टमेंटमध्ये तो घेऊन गेला. तिथे पायऱ्यावरच तिच्याशी बळजबरी केली. तिच्या जवळील पर्स हिसकावून पसार झाला. पर्समध्ये सोनसाखळी आणि रोख साडेतीन हजार रुपये होते. पीडित महिला अस्ताव्यस्त अवस्थेत खाली आली. आरडाओरड केल्यानंतर लोकांची गर्दी झाली. लोकांच्या मदतीने प्रतापनगर ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
Uttar Pradesh: 4 वर्षांच्या लेकराला आधी विष दिला, नंतर पती-पत्नीने घेतला गळफास; कारण काय?